पुणे

कचऱ्याने वेढला नव्या कॅनॉल रस्ता

CD

घोरपडी, ता. २६ : बीटी कवडे रस्ताहून एम्प्रेस गार्डनकडे जाण्यासाठी नजीकचा रस्ता म्हणून वापरला जाणारा नव्या कॅनॉल रस्ता सध्या कचऱ्याच्या विळख्यात सापडला आहे. दिवसेंदिवस रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असून दुर्गंधी, अस्वच्छता व कचरा थेट रस्त्यावर पसरत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या मार्गावर दुचाकींची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. कामावर जाणाऱ्या काही नागरिकांकडून तसेच परिसरातील व्यावसायिकांकडून कचरा टाकला जात आहे.
रस्त्याच्या कडेला घरगुती कचरा, प्लॅस्टिक पिशव्या, खाद्यपदार्थ, खराब फळ-भाज्या मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. भाजी विक्रेत्यांकडून उरलेली, सडलेली भाजी तसेच फळांवरील प्लॅस्टिक कव्हर आणि पिशव्या सर्रास फेकल्या जात आहेत. कचरा साचल्यानंतर काहीजण तो जाळून टाकत असल्याने परिसरात धूर आणि तीव्र दुर्गंधी पसरते. त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
कॅनॉल रस्त्याचा काहीभाग महापालिकेच्या, तर काहीभाग कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत येतो. त्यामुळे स्वच्छतेच्या कामाबाबत दोन्ही प्रशासनांकडून एकमेकांकडे जबाबदारी ढकलली जात आहे. परिणामी साफसफाई होत नसून कचरा साचतच चालला आहे. कचऱ्याचे ढीग वाढत असल्याने काहीवेळा तो थेट रस्त्यावर येतो. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः सकाळसंध्याकाळ गर्दीच्या वेळेत दुचाकीस्वारांना अडचणींचा सामना करावा लागतो.


नियमित साफसफाई करून कचरा उचलण्याची व्यवस्था करावी, कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी तसेच कॅनॉलच्या पुलावर जाळी बसवावेत. अन्यथा येत्या काळात नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतील.
- ज्ञानेश लवंड, स्थानिक नागरिक

हा रस्ता महापालिका आणि कॅन्टोन्मेंट हद्दीत आहे. महापालिका हद्दीतील साफसफाई होत असते. कॅनॉलमध्ये कचरा टाकू नये, यासाठी जाळी लावण्यात येत आहे. तसेच स्वच्छतेबाबत पाटबंधारे विभाग व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला आहे.
- करण लाटवडे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, वानवडी क्षेत्रीय कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parth Pawar to Join Rajya Sabha: पार्थ पवार राज्यसभेवर जाणार! राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रफुल पटेल यांनी केली घोषणा

India Semi-Final Scenario: द. आफ्रिकेच्या विंडीजवरील विजयानं भारताचं नेट रन रेटचं टेन्शन झालं कमी! आता कसं आहे सेमीफायनलचं समीकरण?

Shivraj Singh Chouhan News : शेतकऱ्यांसाठी Good News!, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले..

Video: वाल्मिक कराड पुन्हा करु शकतो जामिनासाठी अर्ज; जाणून घ्या काय आहे तरतूद?

Latest Marathi News Live Update : पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवणार - प्रफुल पटेल

SCROLL FOR NEXT