पुणे

करमाळा नगरपरिषदेत घरपट्टीवरील वाढीव व्याजदर रद्द करण्याची मागणी विरोधी पक्षनेते नगरसेवक प्रशांत ढाळे

CD

करमाळा न.प. हद्दीतील
घरपट्टी व्याज रद्द करा
विरोधी पक्षनेते प्रशांत ढाळेंची मागणी
सकाळ वृत्तसेवा
करमाळा, ता. २७ : करमाळा येथील नगरपरिषद हद्दीतील घरपट्टीवरील व्याज तत्काळ रद्द करून मालमत्ताधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते नगरसेवक प्रशांत ढाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी सचिन तपसे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे.
नगरपरिषदेने घरपट्टीवरील केलेली वाढ व त्यावरील व्याज ही सर्वसामान्य नागरिकांना भरणे आर्थिक भुर्दंड ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सध्याच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांवर आधीच विविध करांचा ताण असताना, वाढीव घरपट्टीमुळे थकबाकीदारांची अडचण अधिक वाढत आहे. अनेक मध्यमवर्गीय व सर्वसामान्य कुटुंबांना हे व्याज भरणे परवडणारी बाब नसल्याने ती तत्काळ मागे घ्यावी. या संदर्भातील ठराव नगरपरिषद सभागृहात मांडण्यात आल्यास शिवसेनेचे पाचही नगरसेवक त्या ठरावाच्या बाजूने मतदान करतील, असे प्रशांत ढाळे यांनी स्पष्ट केले. नागरिकांना आर्थिक दिलासा देणे हीच आपली प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक युवराज चिवटे, अश्विनी कांबळे- अब्दुले, सुवर्णा आलाट, साजेदा कुरेशी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swami Avimukteshwaranand : स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना मोठा दिलासा; अलाहाबाद उच्च न्यायालयाने अटक स्थगित केली

Rashmika wedding: ना पुरोहित , ना अग्नि; तरीही पवित्र! जाणून घ्या रश्मिका–विजयच्या कोडावा पद्धतीतील विवाहसोहळ्यामागील अनोख्या परंपरा

Silver Buying Tips : ऑनलाइन सिल्वर ज्वेलरी खरेदी करताय? मग बनावट चांदीपासून राहा सावध, आत्ताच पाहा फेक ओळखायच्या 'या' 5 ट्रिक्स

Akola News : स्मार्ट मीटरचा पातूर पोलीस स्टेशनला दणका; चार महिन्यांचे ५२ हजार रुपये बिल थकीत, वीजपुरवठा खंडित

Crime: भयंकर! क्षुल्लक वाद विकोपाला गेला; २१ वर्षीय तरूणाने १२ वर्षीय भावाला संपवलं, अमरावतीत धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT