Crime sakal
पुणे

Crime News : हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी प्राध्यापकावर गुन्हा

हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सिंबायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड कॉमर्समधील प्राध्यापकाविरुध्द डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सिंबायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड कॉमर्समधील प्रा. अशोक सोपान ढोले (वय ४३, रा. सिंहगड रस्ता) यांच्याविरुध्द डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, महाविद्यालयाकडून प्रा. ढोले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

प्रा. ढोले यांनी हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून विद्यार्थ्यांमध्ये द्वेष भावना पसरविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी महाविद्यालयासमोर आंदोलन करत निषेध नोंदविला. तसेच, या प्राध्यापकास निलंबित करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे म्हणाले, ‘‘पुण्यात विविध ठिकाणांहून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात ढोले यांच्यासारखे प्राध्यापक विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न करतात, हे मुळीच सहन केले जाणार नाही.’’ दरम्यान, ‘‘ढोले यांचे निलंबन केले असून, सरकारी नियमानुसार कार्यवाहीची प्रक्रिया सुरू केली आहे,’’ अशी माहिती प्राचार्य डॉ. ऋषीकेश सोमण यांनी दिली.

डेक्कन पोलिसांकडून गुन्हा दाखल -

प्रा. ढोले यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्री डेक्कन पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केले. या वेळी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे आणि परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी पोलिस ठाण्यात येऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. हे आंदोलन गुरुवारी पहाटेपर्यंत सुरू होते.

या संदर्भात रवींद्र दिलीप पडवळ (रा. वडकी गाव, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून प्रा. ढोले यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केल्याची माहिती डेक्कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विपिन हसबनीस यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT