Pune Crime sakal
पुणे

Pune Crime : लाइफगार्डसह पाच जणांवर तरुणाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा

कात्रज परिसरातील जलतरण तलावात बुडून २१ वर्षीय तरुणाच्या मृत्यूप्रकरणी कोच, लाइफगार्ड यांच्यासह पाच जणांवर भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. २० एप्रिल रोजी ही घटना घडली होती.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कात्रज परिसरातील जलतरण तलावात बुडून २१ वर्षीय तरुणाच्या मृत्यूप्रकरणी कोच, लाइफगार्ड यांच्यासह पाच जणांवर भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. २० एप्रिल रोजी ही घटना घडली होती.

रॉयल एक्वाटिक क्लबचे मालक, व्यवस्थापक रूपेश राजेंद्र शिर्के (वय ३४, रा. मुळशी), कोच संतोष राजेंद्र कांबळे (वय ३५, रा. वडगाव), लाइफगार्ड प्रसाद सतीश ढोके (वय ३५, कसबा पेठ), आदित्य अरुण गुरव (वय २१), संदीप भिमाशंकर सलगर (वय २१, रा. बिबवेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. साहिल महेंद्र उके (वय २१, रा. साईनगर, कोंढवा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत त्याचे वडील महेंद्र यांनी फिर्याद दिली. साहिल मागील तीन महिन्यांपासून प्रशिक्षण घेत होता. घटना घडली तेव्हा संबंधित व्यवस्थापक, लाइफगार्ड, कोच कोणीही हजर नव्हते. साहिल याला वैद्यकीय मदत न पुरविल्यामुळे तसेच अक्षम्य हलगर्जीपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT