sambhaji bhide 
पुणे

भीमा कोरेगाव - भिडेंवरील गुन्ह्याप्रकरणी मानवाधिकार आयोगाचे पुण्याच्या एसपींना समन्स

सकाळ डिजिटल टीम

पुणे - भीमा कोरेगाव प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्या प्रकरणी महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाने पुणे पोलिस अधीक्षकांना समन्स पाठवले आहेत. भीमा कोरेगावमध्ये 2018 ला झालेल्या हिंसाचाराशी कनेक्शन असल्याप्रकरणी संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल आहे.  याबाबत ठाण्यातील वकील आदित्य मिश्रा यांनी मानवाधिकार आयोगाकडे धाव घेत तक्रार केली आहे. त्यांनी म्हटलं की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांच्याविरोधातील गुन्हा मागे घेण्याबाबत विधानसभेत वक्तव्य केलं होतं. मात्र अद्याप भिडेंविरोधातील गुन्हा तसाच आहे. 

फडणवीस यांनी संभाजी भिडेंविरोधात कोणताही पुरावा नसल्याचं मह्टलं होतं. ज्या महिलेनं भिडेंविरोधात तक्रार दाखल केली, त्यांच्यावर हिंसाचाराचे आरोप केले तिने न्यायालयासमोर भिडेंना ओळखत नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तसंच तिने फक्त भिमा कोरेगाव प्रकरणी लोक काय म्हणतात याच्या आधारावर तक्रार दाखल केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी 27 मार्च 2018 रोजी विधानसभेत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत माहिती देताना हे स्पष्ट केलं होतं. 

फडणवीसांच्या वक्तव्याचा आधार घेत मिश्रा यांनी आता मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली आहे. त्यानंतर महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाने पुणे पोलिस अधीक्षकांना समन्स बजावले आहेत. त्यात मिश्रा म्हटलं की, भीमा कोरेगाव प्रकरणी संभाजी भिडेंविरोधात असलेल्या गुन्ह्याच्या तपासाची सद्यस्थिती काय आहे याची माहिती द्या. तसंच कायद्यानुसार न्याय मिळावा, अजुन किती काळ एफआय़आरची टांगती तलवार भिडे गुरुजींच्या डोक्यावर ठेवणार? असा प्रश्नही मिश्रा यांनी विचारला आहे. 

भीमा कोरेगावमध्ये 1 जानेवारी 2018 रोजी हिंसाचार झाला होता. याप्रकरणी शिव प्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर आरोप करण्यात आला होता. याप्रकऱणी मिलिंद एकबोटे यांना त्यावेळी अटक करण्यात आली होती.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : 'मी महादेवाचा अवतार, तुला चांगलं करिअर घडवायचं असेल तर..'; वासनांध खरातचा शिक्षण घेणाऱ्या युवतीवर अत्याचार, कॅप्टनविरोधात सातवा गुन्हा

IPL 2026 Marathi News: चेन्नई सुपर किंग्सचं चाहत्यांसाठी मोठं सरप्राईज... ऋतुराजने सांगितली ओपनिंग जोडी, आता धमाल येणार

Akkalkot News: तीर्थक्षेत्र अक्कलकोटमध्ये दर गुरुवारी मांस विक्री बंद; नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टींचा घोषणा; आजपासून अंमलबजावणी!

Vaibhavwadi Kolhapur Railway Project : वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा ‘डीपीआर’ तयार : रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची माहिती

Bangladesh Bus Accident : प्रवाशांनी खचाखच भरलेली बस नदीत उलटली, २३ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT