1puneuniversity_6.jpg
1puneuniversity_6.jpg 
पुणे

'कमवा आणि शिका' योजनेत गैरव्यवहार प्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 'कमवा आणि शिका' योजनेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याची कबुली उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी सोमवारी विधानसभेत केली. याप्रकरणात दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना काही तास काम केल्यानंतर त्यांच्या बँकखात्यात मानधन जमा केले जाते पण, गेल्या काही वर्षापासून विद्यापीठात बोगस विद्यार्थी दाखवून मानधनाची रक्कम घेण्याचा प्रकार सुरू आहे. यासंदर्भात आमदार विजय काळे आणि भीमराव तापकीर यांनी लेखी प्रश्न विचारला होता. प्रश्न उत्तराच्या तासामध्ये चर्चेला हा प्रश्न आला, त्यावेळी वायकर यांनी ही कबुली दिली. 

याप्रकरणाची विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरूण अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून चौकशी सुरु असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर काही सदस्यांनी 'गैरप्रकार झाला असेल, तर चौकशी कसली करता, कारवाई काय करणार ते सांगा,' असा आग्रह धरला. तेव्हा सदस्यांची मागणी मान्य करित राज्यमंत्री वायकर यांनी याप्रकरणात दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल,अशी घोषणा केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT