crime_wome.jpg
crime_wome.jpg 
पुणे

आईसह मुलीवरही बलात्कार करण्याची धमकी; गुन्हा दाखल

सकाळवृत्तसेवा

पुणे : विवाहीतेसमवेत काम करणाऱ्याने तिच्यावर बलात्कार करुन महिलेच्या लहान मुलीवरही बलात्कार करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात शुभम पाटील (वय 25, रा. सोलापुर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

याप्रकरणी तीस वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी व आरोपी एकाच सराफी दुकानामध्ये कामाला आहेत. त्यामुळे त्यांची ओळख होती. ओळख वाढवून आरोपीने महिलेला त्याच्यासमवेत राहण्यासाठी सातत्याने तगादा लावला होता. त्यानंतर त्याने शेवाळवाडी येथील सदनिकेवर महिलेला नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता.

संबंधीत प्रकार महिलेने तिच्या नवऱ्यास किंवा अन्य कोणास सांगितल्यास महिलेच्या लहान मुलीस पळवून नेऊन तिच्यावरही बलात्कार करण्याची धमकी आरोपीने दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने याबाबत पोलिसांकडे धाव घेऊन आरोपीविरुद्ध फिर्याद दिली. हडपसर पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

SCROLL FOR NEXT