A case has been registered against BJP MLA Mangal Prasad and his son at Chaturangi police station Ransom fraud case 
पुणे

खंडणी, फसवणूकप्रकरणी भाजप आमदार मंगलप्रसाद लोढा यांच्यासह मुलावर पुण्यात गुन्हा दाखल

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे : भाजपचे मुंबईचे अध्यक्ष, आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह त्यांच्या मुलाविरोधात खंडणी आणि फसवणुकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील चतु:शृंगी पोलीस ठाण्यात शुक्रवारी हा गुन्हा दाखल करण्यात आला. लोढा यांच्या विरोधात फौजदारी दावा महिलेने शिवाजीनगर सत्र न्यायालयात दाखल केला होता. यामध्ये लोढा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने लोढा यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

ज्वाला रिअल इस्टेट प्रा. लि. व मायक्रोटेक डेव्हलपर्सचे मालक मंगलप्रभात लोढा, त्यांचा मुलगा अभिषेक तसेच सुरेंद्रन नायर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. खंडणी, फसवणूक, धमकी या प्रकरणी एका ५३ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला वकील असून चतु:शृंगी भागात राहतात. लोढा यांचे कार्यालय मुंबईतील महालक्ष्मी भागात अपोलो मिल कंपाऊंडमध्ये आहे. 

महत्त्वाची बातमी : कोरोनातही जल्लोषात साजरा केला 'शेहनशहा' बैलाचा वाढदिवस, YouTube ची लिंक पाहून पोलिस आले घरी
''फिर्यादीला मुंबईत फ्लॅट घ्यायचा होता वरळी भागात असलेल्या लोढा पार्कमधील ‘मार्किंग्ज’ गृहप्रकल्पात प्लॅट खरेदी करण्याचे त्यांनी ठरविले. या फ्लॅटची मुळ किंमत पाच कोटी ५९ लाख २७ हजार रुपये ठरविण्यात आले होती. लोढा यांना 2013 नंतर फिर्यादी महिलेने वेळोवेळी 3 कोटी 92 लाख रुपये दिले. मात्र, मागील 9 वर्षात फ्लॅटचा ताबा मिळाला नाही. त्यामुळे फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लोढा आणि नायर यांनी फिर्यादी महिलेला धमकावण्यास सुरुवात केली.  ''4 कोटी 15 लाख 15 हजार एवढी वाढीव रक्कम भरा, अन्यथा फ्लॅट खरेदी करार रद्द करण्यात येईल तसेच यापूर्वी भरण्यात आलेली रक्कम देखील जप्त करण्यात येईल'' अशी  धमकी दिल्याचे महिलेच्या फिर्यादीत म्हटले आहे. 

लोढा यांनी आजतागायत फ्लॅटचा ताबा दिलेला नाही आणि मला धमकावून खंडणी मागितली,’ असा फौजदारी दावा महिलेने शिवाजीनगर सत्र न्यायालयात दाखल करून गुन्हा दाखल करण्याची मागणी दाव्याद्वारे केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने लोढा यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: रविवारी सुट्टीची गरज का आहे? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी तरुण वकिलांना काय दिला सल्ला?

Devendra Fadnavis:‘बारामती’ बिनविरोध होण्यास‘प्रसिद्धी’मुळे खोडा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रमुख पक्षांच्या प्रयत्नांनाही धक्का!

Kolkata Knight Riders: अजिंक्य रहाणेला दिलासा! १८ कोटींचा स्टार अखेर मैदानात; KKR चं टेंशनचं मिटल

Shevgaon Murder: तरुणाचा दगडाने ठेचून खून; शेवगावमधील घटना, ओढ्याजवळ अढळला मृतदेह, तीन संशयित ताब्यात, काय घडलं!

Mumbai Local Train : थरकाप उडवणारी घटना! विक्रोळी स्थानकावर लोकलचा थांबा चुकला, काही क्षणातच मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT