Shyam Manav 
पुणे

Shyam Manav : श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी, पुण्यात गुन्हा दाखल!

सकाळ डिजिटल टीम

पुणे : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांना जिवे मारण्याची धमकी आली होती. तुमचा दाभोळकर करू, अशी धमकी श्याम मानव यांना देण्यात आली होती. त्यानंतर श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.

धिरेंद्र महाराजांच्या भक्तांकडून ही धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्याम या प्रकरणी पुण्यातील हिंजवडीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

याप्रकरणी  श्याम मानव यांच्या मुलाने तक्रार दिली. हिंजवडीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्याम मानव यांच्या विरोधात काही कट रचून त्यांना मारण्याचा प्रयत्न होता. या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. पुढील कारवाई हिंजवडी पोलीस करत आहेत. 

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते व श्याम मानव यांच्या मुलाच्या मोबाईलवर हे धमकीचे मॅसेज करण्यात आले आहेत, अशी माहिती कार्यकर्ते हरीश देशमुख यांनी दिली होती. तुमचा दाभोळकर करु, अशी धमकी श्याम मानव यांना देण्यात आली होती. यापूर्वी देखील श्याम मानव यांच्या कार्यक्रमात गोंधळ झाला आहे होता. सभा संपताच काही कार्यकर्त्यांनी उभे राहत त्यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी केली होती. 

श्याम मानव हे फक्त हिंदु धर्माच्या विरोधात बोलून हिंदू धर्माला बदनाम करतात. त्यांनी धिरेंद्र कृष्ण महराज यांची पोलखोल केली नाही. फक्त हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी सभेचा वापर केला, असा आरोप तरुणांकडून करण्यात आला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं उच्चांकापासून 26 हजारांनी स्वस्त! पाहा ताजा भाव; पुढे सणासुदीच्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?

पत्नीच्या खून प्रकरणी पती-सासऱ्यासह ८ जण तुरुंगात गेले, १२ वर्षांनी जिवंत सापडली महिला

MPSC Exam Success Story : शेतकरी बापाची लेक अन् आई पोलिसात! जाधववाडीच्या निकिताची MPSC मध्ये गगनभरारी, महसूल सहाय्यकपदी निवड

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Caste Validity Certificate : जातवैधता प्रमाणपत्राचा आग्रह न धरता तात्पुरता प्रवेश द्या; उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

SCROLL FOR NEXT