Naveen Kumar Jindal
Naveen Kumar Jindal Sakal
पुणे

नवीनकुमार जिंदाल यांच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

भारतीय जनता पक्षाने हकालपट्टी केलेल्या माध्यम प्रभारी नवीनकुमार जिंदाल यांच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे - प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाने हकालपट्टी केलेल्या माध्यम प्रभारी नवीनकुमार जिंदाल यांच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झाकीर इलियास शेख (वय ३०, रा. मिठानगर, कोंढवा खुर्द) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिंदाल हे भाजपचे दिल्लीतील माध्यम प्रभारी म्हणून काम पाहत असताना त्यांनी एक जून रोजी आक्षेपार्ह ट्विट केले होते. त्यावरून एका विशिष्ट धर्मीयांच्या भावना दुखावल्या. त्यांच्या या ट्विटनंतर देश-परदेशातून आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर हि तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

त्यामुळे पक्षाच्या धोरणाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत भाजपने जिंदाल यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. याप्रकरणी शेख यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून जिंदाल यांच्याविरुद्ध राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचविणे, धार्मिक भावना दुखावणे अशा कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT