Prime Minister Narendra Modi  saskal
पुणे

Crime News : पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेल पाठविणाऱ्यावर गुन्हा दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन देशभरात बॉम्बस्फोट घडविण्यात येणार आहे, असा मेल एका संकेतस्थळ चालकास पाठविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन देशभरात बॉम्बस्फोट घडविण्यात येणार आहे, असा मेल एका संकेतस्थळ चालकास पाठविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मेल मिळालेल्या व्यक्तीने याबाबतची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर अलंकार पोलिसांनी त्वरित मेल पाठविणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिस नाईक राजेश कृष्णाजी शिर्के यांनी अलंकार फिर्याद दिली आहे. त्यानुसार एम. एम. मोखीम नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूगाव परिसरातील राहुल दुधाणे हे ‘हिंदूजम फॅक्ट्स नावाचे संकेतस्थळ चालवितात.

सहा ऑगस्टला दुधाणे एरंडवणे भागातील एका खासगी रुग्णालयात आले होते. त्यावेळी मोखीम याने तायडे यांना इमेल पाठविला. देशभरात बाँबस्फोट घडविण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्यात येणार आहे, असा मजकूर त्या मेलमध्ये आहे. मी दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत करणार असल्याचे मोखीमने मेलमध्ये म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक गणेश चव्हाण या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोनालिसाचं जगप्रसिद्ध पेंटिग असलेल्या संग्रहालयात दरोडा; ४ मिनिटात नेपोलियाच्या ९ वस्तूंची चोरी, राणीचा मुकूट सापडला

खासदार बाबा की अभिनेत्री आई ? कोणाकडून वारशाने बाळाला मिळणार जास्त प्रॉपर्टी

Ravindra Dhangekar On Murlidhar Mohol: पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागेवरून नवा वाद पेटला | Sakal News

Karad Crime: 'कऱ्हाडजवळ तिन पिस्टलसह तिघेजण ताब्यात'; साडेआठ लाखाचा मुद्देमाल जप्त, कऱ्हाड पाेलिसांची कामगिरी

Diabetes Causes India: भारतातील मधुमेहाची कारणे अन् उपाय, संशोधनात माहिती समोर

SCROLL FOR NEXT