पुणे

महाराष्ट्र पोलिसांची सीसीटीएनएस/आयसीजेएस'ला प्रणाली ठरली प्रथम 

पांडुरंग सरोदे

पुणे ः नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्यावतीने (एनसीआरबी) नुकत्याच पार पडलेल्या ऑनलाईन परिषदेत महाराष्ट्र पोलिसांच्या "क्राईम ऍन्ड क्रिमीनल ट्रॅकींग नेटवर्क सिस्टीम' (सीसीटीएनएस/आयसीजेएस) प्रणालीस शोध वर्गवारीमध्ये प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट प्रणाली वापरचा पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. 

"एनसीआरबी'तर्फे दिल्ली येथे ऑनलाईन पद्धतीने "गुड प्रॅक्‍टीसेस इन क्राईम ऍण्ड क्रिमीनल ट्रॅकींग नेटवर्क सिस्टीम (सीसीटीएनएस) आणि इन्ट्रोपोरेबल क्रिमीनल जस्टीस सिस्टिम (आयसीजेएस) परिषद घेण्यात आली. या परिषदेमध्ये सीसीटीएनएस/आयसीजेएस या शोध वर्गवारीमध्ये देशातील अन्य राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमधील पोलिस दलांच्यावतीने त्यांचे विविध उपक्रम समाविष्ट होते. त्यामधील शोध वर्गवारीमध्ये महाराष्ट्र पोलिसांची "सीसीटीएनएस/आयसीजेएस' ही प्रणाली देशात सर्वोत्कृष्ट ठरली. त्याबाबतची घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाने केली, अशी माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागातर्फे देण्यात आली. 

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, विशेष पोलिस महानिरीक्षक प्रविण साळुंके, पोलिस उपमहानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिक्षक संभाजी कदम, अपर पोलिस अधीक्षक नंदा पाराजे, पोलिस उपाधीक्षक जितेंद्र कदम, चंद्रशेखर सावंत, पोलिस निरीक्षक प्रशांत पांडे, शशिकला काकरे, प्रमोद जाधव यांच्या या प्रणालासीठी विशेष काम केले. 

* काय आहे "सीसीटीएनएस/आयसीजेएस ? 
विविध प्रकारच्या गुन्ह्याच्या तपासामधील गुन्हे प्रकटीकरण, गुन्ह्यांचे पर्यवेक्षण, गुन्हे प्रतिबंध करणे याकरीता या प्रणालीची मदत होते. या प्रणालीमध्ये देशपातळीवरील गुन्हे व गुन्हेगारांची माहिती गुन्हे प्रकटीकरण, गुन्हेगारांचा कार्यपध्दतीप्रमाणे शोध, शस्त्र परवाना तसेच तपासामध्ये गुन्ह्यांची सध्यस्थिी इत्यादी माहिती अद्यायावत करण्यात येते. गुन्हे प्रतिबंधात्मक कारवाई करणे, पारपत्र, चारित्र्य पडताळणी, वाहनांबाबतची पोलिस रेकॉर्डवरील माहितीची पडताळणी अशा माहितीचाही प्रणालीमध्ये समावेश केलेला आहे. 

सीसीटीएनएस-आयसीजेएस या प्रणालीच्या साह्याने 1573 गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. त्यापैकी 743 चोरीला गेलेल्या मालमत्तेचा शोध, 693 हरवलेल्या व बेवारस मृत व्यक्तींचा शोध, 7 हजार 883 आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई, 507 प्रकरणांमध्ये जामीन फेटाळले आहे. तर 13 हजार 721 व्यक्तींची पडताळणी करण्यात आली आहे. याबरोबरच 4 हजार 601 इतक्‍या व्यक्तीविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर 1 लाख 17 हजार 26 पारपत्र व चारित्र्य पडताळणी प्रकरणामध्ये 2 हजार 837 गुन्हे दाखल झाले असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

(संपादन : सागर डी. शेलार)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: एरंडोल येथे पोलीस स्टेशनच्यावतीने दादासाहेब पाटील महाविद्यालयात गुरु गौरव कार्यक्रमाचे आयोजन

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

'या' नक्षत्रांमध्ये जन्मलेली मुलं असतात अतिशय भाग्यशाली; सौंदर्य, यश आणि धनसंपत्तीने होतात समृद्ध

SCROLL FOR NEXT