पुणे

चिखलठाण येथे संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

CD

संभाजी महाराज जयंती
चिखलठाणमध्ये उत्साहात
चिखलठाण : येथील जगदंब ग्रुपच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त ह.भ.प. गोवर्धन महाराज अवचर यांचे कीर्तन झाले. त्यांनी संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग आणि धर्मरक्षणासाठी दिलेल्या बलिदानाचा गौरव करत त्यांच्या आदर्शाचे पालन करण्याचे आवाहन केले. यावेळी कला, क्रीडा, नोकरी व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना ‘चिखलठाणरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच वृक्षारोपण कार्यक्रमही झाला. कार्यक्रमास ग्रामस्थ व जगदंब ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----
रिपाइंचा आज कुर्डुवाडी
पालिकेवर हलगी मोर्चा
कुर्डुवाडी : दलित वस्त्यांतील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ रिपाइं (ए) तर्फे शुक्रवारी (ता. १५) सायंकाळी ५ वाजता कुर्डुवाडी नगरपालिकेवर ‘हलगी मोर्चा’ काढण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन माढा तालुका युवा अध्यक्ष आकाश जगताप यांनी नगरपालिकेला दिले. दलित वस्त्यांमध्ये नागरी सुविधांचे प्रश्न गंभीर बनले असून, वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रशासनाला जागे करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
-----
अंजनगावातील जि.प.
शाळेत बोअरवेल
मानेगाव : माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी पुष्पा फाउंडेशनच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून बोअर घेण्यात आले. फाउंडेशनचे अध्यक्ष आदिनाथ बाबासाहेब इंगळे यांनी हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची पाणी समस्या दूर केली. ‘शाळेला गावचा आधार आणि गावाला शाळेचा अभिमान’ या भावनेतून हे सामाजिक काम करण्यात आले. यावेळी नवनाथ इंगळे, सरपंच प्रतिनिधी प्रदीप चौगुले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनायक जाधव, मुख्याध्यापक बाळासाहेब काशीद यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
---
प्रणव इंगळे गणित
विषयात राज्यात प्रथम
गौडगाव : लोकसेवा विद्यालय, श्रीपत पिंपरी (ता. बार्शी) येथील विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. स्वराज घुगे याने ९२.८० टक्के, प्रणव इंगळे याने ९१.४० टक्के तर श्रेया पाटील हिने ८६.८० टक्के गुण मिळविले. गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवत प्रणव इंगळे राज्यात प्रथम ठरला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विनायकराव गरड, मुख्याध्यापक विलास लोहोकरे, संचालक मंडळ, शिक्षक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT