Railway
Railway Sakal
पुणे

मध्य रेल्वेची इंधनखर्चात ८८ कोटींची बचत

सकाळ वृत्तसेवा

मध्य रेल्वेने एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत हेड ऑन जनरेशन (एचओजी) वीजपुरवठा प्रणाली अवलंबून डिझेलवरील खर्चात ८७.७७ कोटींची निव्वळ बचत केली आहे.

पुणे - मध्य रेल्वेने (Central Railway) एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत हेड ऑन जनरेशन (एचओजी) (HOG) वीजपुरवठा प्रणाली अवलंबून डिझेलवरील (Diesel) खर्चात (Expenditure) ८७.७७ कोटींची निव्वळ बचत केली आहे.

एचओजी तंत्रज्ञानाचा वापर एलएचबी प्रकारच्या कोचमध्ये केला जात आहे. मध्य रेल्वेने ७५ एलएचबी कोचमध्ये एचओजी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. एचओजी तंत्रज्ञानामध्ये थ्री-फेज इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हमधून वीज पुरवली जाते. जी पॅन्टोग्राफद्वारे थेट इलेक्ट्रिक ट्रॅक्शनमधून पॉवर काढून मेल, एक्स्प्रेस गाड्यांच्या डब्यातील एअर कंडिशनर, इलेक्ट्रिक बल्ब पंखे आणि पॅन्ट्री आदींमध्ये वीजपुरवठा केला जातो.

एचओजी तंत्रज्ञानाचे फायदे

  • पॉवर कारमधील डिझेलचा वापर कमी करण्याच्या दृष्टीने आर्थिक बचत

  • वायुप्रदूषणात घट

  • जनरेटर कार काढून टाकल्यामुळे ध्वनी प्रदूषणात घट

  • पॉवर कारच्या जागी प्रवासी कोच जोडून प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढते, परिणामी उत्पन्न वाढते

  • जनरेटिंग उपकरणांची कमी संख्या, कमी देखभाल आदींमुळे चांगली विश्‍वासार्हता राहते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मनीष सिसोदियांना झटका! कोर्टानं दुसऱ्यांदा नाकारला नियमित जामीन

SCROLL FOR NEXT