पुणे

चाकणमध्ये टोईंग कारवाईला लागणार ब्रेक

CD

चाकण, ता. २७ : चाकण शहरातील ''पी-१'' व ''पी-२'' पार्किंगसह दुचाकीवरील टोईंग व्हॅनची दंडात्मक कारवाई थांबविण्याचा महत्त्वपूर्ण ठराव नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. यामुळे नागरिक, व्यापारी आणि कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शहरात पुरेशी पार्किंग सुविधा उपलब्ध नसताना वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा मनीषा गोरे, गटनेते नितीन गोरे आणि विरोधी पक्षनेते प्रकाश भुजबळ यांनी हा विषय सभेत मांडला. शिवसेनेचे गटनेते नितीन गोरे म्हणाले की, "शहराचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) मंजूर होईपर्यंत आणि हक्काची पार्किंग सुविधा मिळेपर्यंत पोलिसांनी ही कारवाई थांबवणे गरजेचे आहे." या ठरावाचे पत्र पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाला पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात येणार आहे.

अतिक्रमणांचा प्रश्न कायम
नगरपरिषदेने ठराव मंजूर केला असला तरी, शहरातील अरुंद रस्ते आणि वाढती अतिक्रमणे यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. अनेक ठिकाणी पदपथ आणि रस्ते व्यावसायिकांनी व्यापल्याने रुग्णवाहिकांनाही अडथळा निर्माण होतो. त्यामुळे केवळ कारवाई बंद करून चालणार नाही, तर प्रशासनाने अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करावेत, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे. आता पोलिस आयुक्तालय या ठरावावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Highway Accident : महामार्गावर ट्रॅव्हल अन् ‘ट्रेलर’चा भीषण अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू, अनेकजण जखमी

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

ठरलं तर मगची घसरण कायम पण तू हि रे माझा मितवाने गड राखला ; जाणून घ्या या आठवड्याचा टीआरपी

Bhiwandi: भिवंडी महापालिकेत बदलींचा धडाका, कामगार संघटनांची तीव्र नाराजी; कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

Jyotiba Temple : २५९ कोटींचा विकास आराखडा; जोतिबा-यमाई मंदिराचा होणार भव्य कायापालट

SCROLL FOR NEXT