Swabhimani Andolan Esakal
पुणे

Swabhimani Andolan: पुणे-बंगळूर महामार्गावर चक्का जाम; हा मार्ग राहणार बंद, पोलिसांनी केली पर्यायी मार्गाची व्यवस्था

ऊस दराबाबतची बैठक निष्फळ आज पुणे-बंगळूर मार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्का जाम आंदोलन

अंकिता खाणे (Ankita Khane)

ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल मंत्रालयात स्वाभिमानी शेतकरी संघटना व साखर कारखानदार यांची घेतलेली बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे ऊस दरासाठीचे आंदोलन सुरूच राहणार आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज (गुरुवारी) पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम करण्याची घोषणा संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

मागील वर्षी तुटलेल्या उसाचा ४०० रुपयांचा दुसरा हप्ता द्यावा, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दीड महिन्यापासून आंदोलन सुरू केले आहे. दुसरा हप्ता मिळत नाही, तोपर्यंत कारखान्याची धुराडी पेटू न देण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. तरी देखील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील काही कारखानदारांनी ऊसतोड सुरू केल्याने संघर्ष निर्माण झाला आहे. यातून वाहनांची जाळपोळ, मोर्चे, प्रतिमोर्चे सुरू झाले आहेत. या सर्व आंदोलनाचा विचार करून सहकार मंत्र्यांनी बुधवारी बैठकीचे आयोजन केले होते.

या बैठकीत संघटनेने गत वर्षी तुटलेल्या उसासाठी शेतकऱ्याला ४०० रुपयांचा दुसरा हप्ता देण्याची मागणी केली. मात्र, साखर कारखानदारांनी हे पैसे देण्यास अडचण असल्याचे सांगितले. यावरून संघटना प्रतिनिधी व साखर कारखानदार यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. अखेर, ४०० पैकी १०० रुपयांची रक्कम कारखान्यांनी व ३०० रुपयांची रक्कम शासनाने द्यावी, असा प्रस्ताव संघटनेने ठेवला.

दरवर्षी राज्याला ऊस उद्योगाकडून ५५०० कोटी रुपयांचा कर मिळतो. त्यातून ही रक्कम देण्याची मागणी यावेळी करण्यात केली. यावर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे सांगत सहकार मंत्री वळसे पाटील यांनी बैठकीला पूर्णविराम दिला.

दरम्यान आज, आपल्या मागणीसाठी पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन सुरू आहे. काल सहकार मंत्री आणि राजू शेट्टी यांच्यात झालेली शेवटची बैठक फिस्कटल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग बेमुदत अडवण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी दहा वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली परिसरात असणारा पुणे - बेंगलोर हा राष्ट्रीय महामार्ग बेमुदत अडवून आंदोलन करण्यात येत आहे.

आंदोलनाच्या ठिकाणी त्याचबरोबर संपूर्ण महामार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पुणे बेंगलोर महामार्गावरील वाहन अन्य मार्गाने वळवण्यात आले आहेत.

या आंदोलनामुळे कागल लक्ष्मी टेकडी ते शिये परिसरातील महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.तर आंदोलनात हिंसक वळण लागू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Metro: ठाणेकरांचे स्वप्न होणार साकार! मेट्रोच्या ट्रायलला लवकरच सुरुवात; 'या' तारखेपासून उतरणार सेवेत

Crime : १६ वर्षांचा असताना FIR, ३५ व्या वर्षी दोषी अन् ३९ व्या वर्षी निर्दोष सुटका; अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा होता आरोप

Tejashri Pradhan Family : लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे?

Income Tax Bill 2025: नवीन आयकर विधेयक २०२५ मध्ये काय बदल होणार? निवड समितीने १० पॉईंट्समधून सगळंच सांगितलं!

ZIM vs NZ Test: न्यूझीलंडच्या खेळाडूने इरफान पठाणचा २० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; असा पराक्रम करणारा पहिलाच खेळाडू ठरला

SCROLL FOR NEXT