Pune  sakal
पुणे

Pune : घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

आठवडाभराच्या दमदार हजेरीनंतर जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला आहे.

राजेंद्र पाटील - सकाळ वृत्तसेवा

पुणे : आठवडाभराच्या दमदार हजेरीनंतर जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला आहे. पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात रविवारी (ता. २८) आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी; तर घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शनिवारी दिवसभर आकाश ढगाळ होते. एक-दोन हलक्या सरींशिवाय मोठ्या पावसाची नोंद जिल्ह्यात झालेली नाही; मात्र बऱ्याच ठिकाणी गार वारे सुटल्याचे पाहायला मिळाले. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस लवासा येथे ३० मिलिमीटर नोंदविला गेला; तर दौंड, बारामती, इंदापूर आदी पूर्व भागात अर्ध्या मिलिमीटरपेक्षा कमी पावसाची नोंद झाली.

पुढील दोन दिवस आकाश ढगाळ, गार वारे आणि हलक्या सरींची शक्यता कायम राहणार आहे. राज्यातही कोकण आणि घाटमाथ्यावरील पावसाचा जोर काहीसा ओसरला; तरी पावसाची संततधार कायम आहे. रविवारी कोकणातील रायगड आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्याकडील भागात जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ इशारा आहे.

शनिवारचा पाऊस (मिलिमीटर)

(सकाळी ८:३० ते रात्री ८:०० पर्यंत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT