पुणे

चंद्रभागा नदी प्रदूषणाच्या विळख्यात; दूषित पाण्यामुळे जलचर प्राणी व पशुपक्षी धोक्यात

CD

UPR26B07218, UPR26B07217
पंढरपूर : चंद्रभागा नदी पात्रात साचलेला शेवाळाचा थर. (दुसऱ्या छायाचित्रात) पाण्यात मरण पावलेला बदक पक्षी.
---
चंद्रभागा नदी प्रदूषणाच्या विळख्यात
जलचर प्राणी,‌ पशू-पक्षी अन्‌ भाविकांचे आरोग्य धोक्यात
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. ५ : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली पंढरपूरची चंद्रभागा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. नदी पात्रातील दूषित पाण्यामुळे जलचर प्राण्यांबरोबरच पशू-पक्ष्यांचा जीवही धोक्यात आला आहे.
अलीकडेच नदी पात्रातील दूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असतानाच, आता नदीतील पाणी प्यायल्यामुळे पक्षीही मृत पावल्याची घटना समोर आली आहे. अशातच नदी पात्रातील दूषित पाण्यामुळे भाविकांच्या आरोग्याचा प्रश्नही पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
माघी यात्रा तोंडावर असतानाच चंद्रभागेतील पाणी दूषित झाल्याने भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. चंद्रभागा नदीतील पाणी स्वच्छ करण्यासाठी राज्य शासनाने सेबर टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. परंतु, ही यंत्रणा कुचकामी ठरली आहे. या योजनेवर राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र, तो खर्चही आता पाण्यात गेल्याचे समोर आले आहे.
राज्य सरकारने ‘नमामि चंद्रभागा’ प्रकल्पाची घोषणा केली आहे; मात्र ही योजना अजूनही कागदावरच आहे. येथील चंद्रभागेच्या पात्रामध्ये स्नानासाठी हजारो भाविक येतात; मात्र नदी प्रदूषित झाल्याने भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर शेवाळाचा थर आल्याने पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे सोमवारी नदी पात्रात एका बदकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
---
कोट
पंढरपूरमधील चंद्रभागेच्या पात्रात प्रचंड प्रदूषण झाले आहे. त्यामुळे पाण्यातील मासे सुद्धा मृत्युमुखी पडत आहेत. चंद्रभागेचे पाणी स्वच्छ राहावे, चंद्रभागा प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी वार्षिक २९ कोटी खर्चून उभारलेली सेबर टेक्नॉलॉजी कुचकामी ठरली आहे. चंद्रभागेच्या पात्रातील पाणी प्रदूषणमुक्त करण्यासाठी तातडीने शासनाने पावले उचलावीत.
- गणेश अंकुशराव, सामाजिक कार्यकर्ते, पंढरपूर
.......
कोट
चंद्रभागा प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. याबाबत पाटबंधारे विभाग व महसूल प्रशासनाला नदी पात्रातील स्वच्छतेसंदर्भात कळविण्यात आले आहे. माघी यात्रेच्या पूर्वी चंद्रभागा नदीत पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे.
- गहिनीनाथ महाराज औसेकर, सहअध्यक्ष, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर‌‌‌ समिती, पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच महिलेने असं काही म्हटलं की… क्षणभर सगळे स्तब्ध झाले! पुढे काय घडलं?

Gold Silver Price Falls : सोने ३ हजार तर चांदी तब्बल ९ हजारांनी उतरली; शेअर बाजारात मोठी खळबळ

Ambarnath : परवानगीशिवाय भाजपसोबत हातमिळवणी, काँग्रेसनं केलं निलंबित; नगरसेवकांचा पक्ष सोडण्याचा इशारा

Ambernath politics: अंबरनाथमध्ये काँग्रेसचे निलंबित नगरसेवक शिवसेनेच्या गळाला?; शिवसेनेकडून 3 नगरसेवक मिळवण्याचे प्रयत्न!

Ajit Pawar : पुणे मेट्रो मनमोहनसिंग यांच्या काळातच मंजूर; अजित पवार यांनी दाखविला भाजपला आरसा

SCROLL FOR NEXT