पुणे - माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते मुरलीकांत पेठकर  यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी (डावीकडे)  डॉ. अजय फुटाणे.
पुणे - माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते मुरलीकांत पेठकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी (डावीकडे) डॉ. अजय फुटाणे. 
पुणे

चंद्रभागेच्या तीरावर नामदेवांचे स्मारक व्हावे - फुटाणे

सकाळवृत्तसेवा

पुणे - घुमानच्या साहित्य संमेलनानंतर पंजाब सरकारने संत नामदेवांच्या नावाने महाविद्यालय सुरू केले. आपल्या सरकारकडे चंद्रभागेच्या तीरावर नामदेवांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव पडून आहे. परंतु सरकार स्मारक उभारणार नाही, असे मत ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले. 

नामदेव समाजोन्नती परिषदेच्या ५४ व्या तीनदिवसीय महाअधिवेशनाच्या सांगता समारोहा वेळी फुटाणे बोलत होते. या महाअधिवेशनात परिषदेतर्फे मुरलीकांत राजाराम पेठकर यांना सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. या वेळी नामदेव समाजोन्नती परिषदेचे सुधीर पिसे, संजीव तुपसाखरे, संदीप लचके, डॉ. अजय फुटाणे, राज्य काँग्रेसचे सदस्य देविदास भन्साळी, माजी आमदार प्रकाश देवळे, नगरसेविका स्मिता वसे, संजय नेवासकर आदी उपस्थित होते. या वेळी नामदेव शिंपी समाजातील प्रतिभावान विद्यार्थी व विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळविणाऱ्या व्यक्तींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

पाटील म्हणाले, ‘‘नामदेवांनी शेवटचा श्‍वासही पांडुरंगाच्या पायरीवर घेतला आहे. तुम्ही परिषदेच्या माध्यमातून १९५४ पासून संत नामदेव महाराजांचा वारसा चालविण्याची परंपरा सुरू ठेवली. यासाठी चंद्रभागेच्या तीरावर स्मारक होणे महत्त्वाचे आहे.’’ सूत्रसंचालन रेणुका महाजन यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

Poha Idali: सकाळच्या नाश्त्यात बनवा चवदार पोहा इडली, जाणून घ्या रेसिपी

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT