chandrakant patil
chandrakant patil esakal
पुणे

सत्ताधारी न्यायालयात का जात नाहीत; चंद्रकांत पाटलांचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

एखादी चौकशी सुरू असताना त्यावर तात्काळ बोलणं योग्य नाही - चंद्रकांत पाटील

पुणे - राष्ट्रवादीचे नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ईडी सूडबुद्धीने कारवाई करते असं विरोधकांनी म्हणायचं नसत. एखादी चौकशी सुरू असताना त्यावर तात्काळ बोलणं योग्य नाही. सत्ताधारी एकही केस न्यायालयात जिंकू शकलेले नाहीत. ते न्यायालयात का जात नाहीत, असा सवाल भाजपाचे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे. आज ते पुण्यात (Pune) बोलत होते.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शहरातील विविध प्रश्नांवर पुणे महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले, ईडी (ED) सूडबुद्धीने कारवाई करते असं विरोधकांनी म्हणायचं नसत. एखादी चौकशी सुरू असताना त्यावर तात्काळ बोलणं योग्य नाही. या केसमध्ये न्यायालयाचा दरवाजा ठोठावला पाहिजे. सत्ताधारी एकही केस न्यायालयात जिंकू शकलेले नाहीत. ते न्यायालयात का जात नाहीत, असा सवाल त्यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले, काँग्रेसकडे (Congress) टीका करण्यासाठी विषय नाहीत म्हणून अर्थहीन चर्चा करत असतात. आमचा येणाऱ्या महापालिकेत मुद्दा हाच आहे. ५० वर्ष विरुद्ध ५ वर्ष असा फॉर्म्युला आहे. आम्ही काय केलं हे सांगू, तुम्ही काय केलं ते सांगा, असेही ते म्हणाले आहेत. जे गलिच्छ बोलतात त्यांना परवानगी आणि मी तर सुसंस्कृत बोलतो, नाव न घेता असा टोला त्यांनी राऊतांना लगावला आहे. भुजबळांना दोन वर्षे जेलमध्ये कोणी भेटायला पण जात नव्हते. शरद पवार नेहमीच समाजात जातीयवाद निर्माण करत असतात, त्यांचा तसा प्रयत्न असतो असा आरोपही त्यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : पाचव्या टप्प्यात मुंबई बनणार ‘रणभूमी’; पंतप्रधानांचा रोड शो आणि सभांचे नियोजन

Water Storage : राज्यात केवळ २५ टक्के पाणीसाठा

Illegal Hoarding : संकटांचे सापळे! अनधिकृत होर्डिंगवरील कारवाईचे कागदी घोडे

Pune Loksabha Election : कोथरूड, वडगावशेरी ठरविणार पुण्याचा खासदार

अग्रलेख : कोसळणारे भ्रष्ट मनोरे...

SCROLL FOR NEXT