चंद्रकांत शहा
वाई : येथील चंद्रकांत माणिकचंद शहा (वय ८८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. धोम पाटबंधारे विभागातून अधिकारी पदावरून ते निवृत्त झाले होते. गुजराथी समाज नवरात्र न्यास मंडळाचे ते सदस्य होते. प्रीतम फोटो फ्लॅशचे मालक व वाई रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रीतम शहा, तसेच मृणाल शहा यांचे ते वडील होत.
----
07481