solapur
solapur sakal
पुणे

Chandrasekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे यांनी चारही मतदारसंघाच्या उमेदवार, पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद

सकाळ डिजिटल टीम

पुणे ः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी पुणे, बारामती, शिरूर व मावळ या चार ही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. चारही मतदारसंघाच्या उमेदवारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. बावनकुळे यांनी रात्री उशिरापर्यंत बैठक प्रचाराची माहिती घेत उमेदवारांना मार्गदर्शनही केले.

बावनकुळे शनिवारी पुणे दौऱ्यावर होते. त्यांनी दिवसभर पक्षाच्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यानंतर सायंकाळी त्यांची पक्षाच्या एरंडवणे येथील कार्यालयात लोकसभा उमेदवारांच्या कोअर कमिटीसमवेत बैठक झाली. यावेळी भाजपचे पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार, मावळ मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांची या बैठकीस उपस्थिती होती.

प्रारंभी शिरूर, मावळ, त्यानंतर बारामती व शेवटी पुणे लोकसभा मतदारसंघाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी लोकसभेचे उमेदवार, लोकसभा उमेदवार कोअर कमिटी, प्रमुख पदाधिकारी यांच्याशी त्यांनी संवाद साधला. प्रमुख पदाधिकारी, कोअर कमिटीमधील 15 जणांकडून प्रचाराची तयारी कशा पद्धतीने करण्यात येत आहे. प्रचाराला मतदारांकडून कसा प्रतिसाद मिळत आहे, कोणत्या भागामध्ये प्रचाराला गती द्यावी लागेल, कार्यकर्त्यांना काय अडचणी येत आहेत, उमेदवारांनी वैयक्तीक पातळीवर मतदारांशी संपर्क साधण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत, याबाबतची माहिती बावनकुळे यांनी घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT