Doctor 
पुणे

Coronavirus : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत पहा किती जणांची तपासणी

सकाळवृत्तसेवा

घरोघर तपासणीसाठी पथके; परदेशातून आलेल्यांना घरीच थांबण्याचा सल्ला
पुणे- पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत घरोघर तपासणीसाठी शंभर पथके तयार करण्यात आली आहेत. सुमारे सात हजारहून अधिक घरांची, तर २१ हजार ५८३ नागरिकांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. दोन्ही महापालिका मिळून २६ हजार ३१५ घरे आणि एक लाख १७ हजार ३८६ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात दहा नागरिकांमध्ये सौम्य लक्षणे आढळून आली असून, त्यांना नायडू रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले आहे.

‘‘परदेशात जाऊन आलेल्या संशयित नागरिकांना घरीच विलगीकरण कक्षात राहण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे. परंतु, त्याचे उल्लंघन करून काही जण बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी येत आहेत. काहींचे फोटोही प्रशासनाकडे आले आहेत. त्यांनी बाहेर फिरू नये; अन्यथा त्यांच्यावर सक्तीने कारवाई करून संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागेल,’’ असा इशारा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिला.

पुणे शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले सात, तर पिंपरी-चिंचवड शहरात दहा रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना घरीच विलगीकरण कक्षात राहण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे. पण, त्यापैकी अनेक नागरिक नियमांचे उल्लंघन करीत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या आहेत. काहींचे थेट फोटोच प्रशासनाला उपलब्ध झाले आहेत. अशा नागरिकांनी आपल्या कुटुंबाबरोबरच समाजातील अन्य लोकांना त्याची लागण होणार नाही, याचे भान ठेवण्याची गरज आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव समाजात होऊ नये, यासाठी त्यांना या सूचना दिल्या आहेत. परंतु नियमांचे उल्लंघन करणे, हे योग्य नाही, असे डॉ. म्हैसेकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada Lottery: म्हाडाच्या घरांची बंपर लॉटरी! मुंबईत घराचं स्वप्न पूर्ण होणार, ८ हजार घरांची सोडत; कधी होणार?

Ram Mandir Donation Scam नोकरीला लागताच वर्षभरात घेतली महागडी कार; गावी आलिशान घर अन् भावालाही पाठवले लाखो रुपये

Latest Marathi Live Update: मॅनहोलमध्ये पडून एका नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतरही मुंबईतील अनेक मॅनहोल अद्याप उघडे

FIFA WORLD CUP 2026: इंग्लंडच्या खेळाडूंना Viagra खाऊन खेळण्याची परवानगी; यजमान मेक्सिकोविरुद्धच्या लढतीपूर्वी का दिलीय ही सूट?

Maharashtra School Strike : पालकांनो नोंद घ्या! 7 आणि 8 जुलै रोजी राज्यातील 'या' शाळा राहणार बंद; शिक्षक समन्वय संघाचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT