पुणे

रसायनशास्त्र

CD

वेळेपूर्वीच ‘रसायन’ची प्रश्‍नपत्रिका व्हॉट्सअपवर?
नागपूरमधील प्रकार; शिकवणी वर्गाचा कारनामा, गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. २१ : राज्य शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयाची प्रश्‍नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वीच एका विद्यार्थिनीच्या व्हॉट्सॲपवर व्हायरल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. केंद्रप्रमुख्याच्या दक्षतेतेमुळे रसायनशास्त्र विषयाचा पेपरमध्ये गैरप्रकार होण्यापूर्वी एका मुलीला ताब्यात घेण्यात आले. एका खासगी शिकवणी वर्गाद्वारे हा पेपर फोडल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी याप्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.
राज्य शिक्षण मंडळाद्वारे बारावीच्या परीक्षेसाठी सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल हे केंद्र देण्यात आले आहे. या केंद्रावर बुधवारी (ता.१८) बारावीचा ‘केमिस्ट्री’ विषयाचा पेपर होता. त्यापूर्वी केंद्रावरील वर्गात बसलेली विद्यार्थिनी ही प्रसाधनगृहात जातो असे सांगून निघाली. ती बराच परत न आल्याने वर्गातील पर्यवेक्षक असलेल्या शिक्षिकेला शंका आली. काही वेळाने ती परत आली. यानंतर पेपरदरम्यान ती सातत्याने प्रसाधनगृहात जात असल्याने शिक्षिकेला तिच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्या. त्यामुळे शिक्षिकेने तिची तपासणी घेतली. त्यात तिच्याकडे स्मार्टफोन असल्याचे आढळून आले. शिक्षिकेने तिला स्मार्टफोन पासवर्ड टाकून सुरू करण्यास सांगितला. तिने तो सुरू करताच, त्यात व्हॉट्सॲप ग्रुपवर साडेदहाच्या सुमारास ‘केमेस्ट्री’ची प्रश्‍नपत्रिका आली असल्याचे आढळले. त्यानंतर त्याच ग्रुपवर संभाव्य उत्तरांचाही आदानप्रदान झाल्याचे समोर आले. शिक्षिकेने तत्काळ केंद्रप्रमुखांना माहिती दिली. केंद्रप्रमुखांनी बोर्डाला माहिती दिल्यावर तत्काळ पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी विद्यार्थिनीची चौकशी केली. तिच्या जबाबावरून आणखी एका विद्यार्थिनीची चौकशी करण्यात आली. प्राथमिक तपासात एका खासगी शिकवणीशी संबंधित व्यक्तीने पैशांच्या मोबदल्यात प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंदवून मोबाईल व ग्रुपमधील संदेशांचा तांत्रिक तपास सुरू केला आहे.
........
‘फिजिक्स’चा पेपरही मोबाइलवर
शिक्षिकेने मोबाइलवरील व्हॉट्सॲप ग्रुपवरील ‘चॅट’ पाहिले असता, केंद्रावरील पर्यवेक्षक शिक्षिकेला तिच्या मोबाइलमध्ये सोमवारी (ता.१६) झालेला बारावीचा फिजिक्स विषयाची प्रश्‍नपत्रिकाही आल्याचे आढळून आले. बोर्डाने मोबाइल जप्त करीत, त्याची तपासणी केली असता, फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या प्रश्‍नपत्रिकेतील काही प्रश्‍न सारखेच असल्याचे तपासणीत आढळून आले आहे. यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT