chhatrapati shivaji maharaj statue
chhatrapati shivaji maharaj statue sakal
पुणे

Manchar News : शिवजयंती सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे खरेदीसाठी शिवभक्तांची लगबग

डी. के. वळसे पाटील

मंचर - छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती सोहळा सोमवारी (ता. १९)रोजी आहे. त्यानिमित्ताने गावोगावी शिवजयंती उत्सवाची तयारी जोरात सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मंचर (ता.आंबेगाव) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे तयार असलेले विविध उंचीचे पुतळे खरेदीसाठी शिवभक्तांची वर्दळ वाढली आहे. 'जय शिवाजी, जय भवानी' असा जल्लोष करत युवक व ज्येष्ठ नागरिक पुतळे खरेदी करत आहेत.

आंबेगाव-जुन्नर भागामध्ये शिवरायांचा सहवास होता. आंबेगाव तालुक्यात श्रीक्षेत्र वडगाव काशिंबे येथे भरणाऱ्या घोड्यांच्या बाजारातून छत्रपतींनी घोडे खरेदी केल्याच्या नोंदी आहेत. तसेच मंचर, घोडेगाव शहरासह जवळपास आंबेगाव तालुक्यातील १०३ गावांमध्ये शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आपल्याही घरी शिवाजी महाराजांचा पुतळा असावा या भावनेने पुतळा खरेदी करण्याकडे युवकांचा कल वाढलेला आहे.

येथे विविध उंचीचे अर्ध्या फुटापासून अडीच फुटापर्यंतचे शिवाजी महाराजांचे पुतळे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे .शंभर रुपयांपासून सातशे रुपये किमतीचे पुतळे येथे विक्रीसाठी राजस्थान येथील धर्मेंद्र राठोड या कारागिराने उपलब्ध करून दिले आहेत

अवसरी खुर्द येथील मिलिंद खुडे, मंचर येथील भाऊसाहेब निघोट, तांबडे मळा येथील विठ्ठल तांबडे, चांडोली बुद्रुक येथील अर्जुन थोरात, आदर्श गाव गावडेवाडी येथील सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी मनोहर थिटे, ऋषिकेश गावडे आदी मान्यवरांची छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा घेण्यासाठी लगबग सुरू होती.

'खेड तालुक्यातील3 कुरळी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सह अन्य महापुरुष, विविध देवतांच्या मूर्ती तयार केल्या जातात. राजस्थान भागातील कारागीर आहेत. पुतळे तयार करताना व विक्री करताना सर्व पावित्र्य राखले जाते. गेल्या तीन दिवसात अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विविध आकारातील पुतळे खरेदी केले आहेत.अजुन चार-पाच दिवस येथे पुतळे विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत.खरेदीला शिवभक्तांचा चांगला प्रतिसाद आहे.'

- धर्मेंद्र राठोड, कारागीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT