पुणे

पाबळला पाचशे जणांना शासकीय योजनांचा लाभ

CD

पाबळ, ता. ९ : पाबळ (ता. शिरूर) येथे शिरूर महसूल विभागाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज‌ महाराजस्व समाधान शिबिर शनिवारी (ता. ७) पार पडले. शासनाच्या विविध विभागांच्या सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत सुमारे पाचशेहून अधिक नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला.

पुणे विभागाचे उपायुक्त संजीव पलांडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या शिबिरास उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर, शिरूरचे उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, भूमी अभिलेखचे उपअधीक्षक अमोल भोसले, गटविकास अधिकारी महेश डोके, मंडळ अधिकारी प्रमोद लोखंडे, जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले, पंचायत समिती सदस्या वंदना पवार, सविता बगाटे, सरपंच सोपान जाधव आदी अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिरात महसूल, कृषी, वनविभाग, पंचायत समिती, भूमी अभिलेख, महावितरण, दुय्यम निबंधक, परिवहन तसेच पोस्ट विभागांनी सहभाग घेत नागरिकांना विविध सेवा व प्रमाणपत्रे जागेवरच उपलब्ध करून दिली. विशेष म्हणजे केंदूर (ता.शिरूर) येथील दुर्लक्षित ठाकर समाजातील तब्बल ऐंशी नागरिकांना उपायुक्त संजीव पलांडे, उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जात प्रमाणपत्रे देण्यात आली.

या शिबिरात पाबळ महसूल मंडळातील पाबळ, केंदूर, धामारी, खैरेनगर, खैरेवाडी, कान्हूर मेसाई, मिडगुलवाडी, हिवरे व पिंपळे खालसा या गावांतील नागरिक उपस्थित होते. यावेळी लाभार्थ्यांना १६६ उत्पन्नाचे प्रमाणपत्रे, १७४ रहिवास प्रमाणपत्रे आणि ८४ जात प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. तसेच संजय गांधी निराधार योजनेतील २३ लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करून त्यांना जागेवरच मंजुरीची पत्रे देण्यात आली. भूमी अभिलेख विभागाकडून पाच मालमत्ता पत्रके व एक मोजणी नकाशा वितरित करण्यात आला. तर कृषी विभागाच्या वतीने ट्रॅक्टर व शेततळे अस्तरीकरणासाठी २५ लाभार्थ्यांना मंजुरीची प्रमाणपत्रे देण्यात आली. या उपक्रमामुळे शेतकरी व नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच छताखाली मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

01806

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra 12th Result 2026 : बारावीचा निकाल जाहीर! कोकण अव्वल, लातूर पिछाडीवर, मुलींचा यशाचा टक्का मुलांपेक्षा ६.३५ ने अधिक

Pune Bhor Child CCTV Video : पुण्यातील अत्याचार करून हत्या केलेल्या ४ वर्षीय चिमुकलीला नेताना सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

Mumbai Family Death Mystery : कलिंगडात विष नव्हतं, मग मृत्यू कसा झाला? मुंबईतील डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, FDA चा धक्कादायक अहवाल समोर

HSC Result: बारावीनंतर नोकरी करायची आहे ? रेल्वेमध्ये करा उत्तम करिअर, टीटीई होण्यासाठी अशी करा तयारी

Mumbai Crime: १,७४५ कोटी रुपयांचे कोकेन महामुंबईत जप्त, एनसीबीची सर्वात मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT