Chocolate rakhi craze in kids 
पुणे

अनोख्या चॉकलेट राखीची क्रेझ, सणाच्या आनंदाबरोबर तोंडही गोड

रक्षाबंधनानिमित्त जिल्ह्यातील बाजारपेठ सजल्या आहेत

अमित गवळे

पाली - रक्षाबंधनानिमित्त जिल्ह्यातील बाजारपेठ सजल्या आहेत. लहानग्यांना राख्यांचे अधिक आकर्षण असते. त्यामुळे विविध कार्टून असलेल्या राख्यांना अधिक पसंती दिसते. मात्र सध्या चॉकलेट राखीची लहानग्यांना क्रेझ पाहायला मिळत आहे. पर्यावरण स्नेही, स्वस्त व उपयुक्त अशा विविध आकाराच्या चॉकलेट राख्यांना मागणी वाढली आहे.

पालीतील चॉकलेट राख्या निर्मात्या निवेदिता भावे यांनी सांगितले की चॉकलेट लहान मुलांमध्ये प्रिय आहे. चॉकलेट राखी हातावर बांधून वरचे चॉकलेट काढून खाता येते. खाली असलेली रंगेबिरंगी रीबीन हातालाच राहते. म्हणजे राखी हातालाच राहते. प्लास्टिकच्या राख्यांपेक्षा कचरा कमी होतो. चॉकलेट दर्जेदार वापरले जाते. व ते तब्बल 20 दिवस टिकते. नेहमीच्या राख्यांपेक्षा काहीतरी वेगळा सेलिब्रेशनचा आनंद मिळतो. आणि बच्चेकंपनी देखील खुश होते. या राख्या साधारण 25 ते 30 रुपयांना मिळतात. त्यामुळे इतर राख्यांच्या तुलनेत त्या खूप स्वस्त आहेत. अनेकांनी आगाऊ बुकिंग केली असल्याचे निवेदिता यांनी सकाळला सांगितले.

विविध आकार, नक्षीकाम, रंग व ड्रायफ्रूट चॉकलेट राख्या गोल, त्रिकोणी, चौकोनी अशा वेगवेगळ्या आकारांमध्ये उपलब्ध आहेत. तसेच चॉकलेटी, गडद काळे, चंदेरी व सोनेरी अशा रंगांमध्ये आणि नक्षीकाम असलेल्या आहेत. याबरोबरच चॉकलेट वर काजू, बदाम, पिस्ता असे वेगवेगळे ड्रायफूट लावलेल्या असणाऱ्या सुद्धा असतात. त्यामुळे या राख्या चवी बरोबरच आरोग्यदायी सुद्धा आहेत. राखीचा बँड मखमली कापडाचा व विविध आकर्षक रंगाचा असल्यामुळे लहानग्यांना खूप आवडतो.

माझ्या अडीच वर्षाच्या छोटया भावाला चॉकलेट राखी बांधणार आहे. मला ही राखी खूप आवडली. तसेच मी स्वतःला देखील चॉकलेट राखी घेणार आहे. कारण मला चॉकलेट आवडते.

- ज्ञानदा ज्ञानेश्वर घोलप, इयत्ता दुसरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT