पुणे

श्री चौडेश्वरी देवी यात्रा आरंभ

CD

PNE26W19188
सोलापूर : श्री रामलिंग चौडेश्वरी मातेची उत्सवमूर्ती.
---
PNE26W19187
कुंकुमार्चन पूजेचे यजमान ओम सास्तुर व अंबिका सास्तुर बालिकेच्या नावे समर्पण करताना.
---
PNE26W19186
कुंकुमार्चन व यात्रेस प्रारंभ करण्यापूर्वी नसरापूर पीडित बालिकेच्या नावे प्रार्थना करताना महिला भक्त.
---
श्री चौडेश्वरी यात्रेत कुंकुमार्चन विधी पीडितेला समर्पित
धार्मिक विधीतून प्रथमच अत्याचाराविरोधात सामूहिक संवेदना; २५१ महिलांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १४ : धार्मिक परंपरेचा सोहळा जेव्हा सामाजिक वेदनेशी एकरूप होतो, तेव्हा तो केवळ उत्सव राहात नाही, तर तो अन्यायाविरुद्धचा एक मूक हुंकार व संताप ठरतो. शुक्रवार पेठेतील ऐतिहासिक १२८ व्या श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रोत्सवाचा प्रारंभ गुरुवारी (ता. १४) अशाच एका अभूतपूर्व संवेदनेने झाला. नसरापूर येथील ‘त्या’ चिमुरडीवर झालेल्या अमानवीय अत्याचाराच्या निषेधार्थ, यात्रेतील अत्यंत पवित्र मानला जाणारा ‘कुंकुमार्चन’ विधी त्या पीडित बालिकेला समर्पित करण्यात आला. सोलापूरच्या आध्यात्मिक इतिहासात एखाद्या यात्रेचा श्रीगणेशा अशा प्रकारे पीडितेसाठी प्रार्थना करून होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
---
महिलांच्या डोळ्यांत दाटले पाणी
सायंकाळी ५.४० वाजता जेव्हा २५१ सुवासिनी कुंकुमार्चनासाठी श्री ललितासहस्रनामाचा जयघोष करत एकत्र जमल्या, तेव्हा वातावरण भक्तिमय होते. मात्र, विधी सुरू करण्यापूर्वी मंदिर समितीचे अध्यक्ष गुरुनाथ निंबाळे यांनी जेव्हा जाहीर केले की, ‘आजची ही सेवा त्या चिमुरडीला न्याय मिळावा आणि समाजात बालिका सुरक्षित राहाव्यात यासाठी तिला समर्पित आहे,’ तेव्हा उपस्थित प्रत्येक मातेच्या काळजाचा ठोका चुकला. भक्तीच्या या व्यासपीठावरून समाजमनातील संताप आणि करुणा एकाच वेळी वाहू लागली.
---
वेदमंत्रांमधून सुरक्षिततेचा हुंकार
प्रधान पुरोहित वेदमूर्ती मल्लिनाथ माळगी स्वामी यांनी आपल्या मंत्रोच्चारांतून त्या चिमुरडीला श्रद्धांजली अर्पण केली. पौरोहित्य करताना त्यांनी भाविकांना अंतर्मुख केले. ‘स्त्रीशक्तीचा सन्मान केवळ मूर्तिपूजेत नसून, तो समाजातील लेकींच्या सुरक्षिततेत आहे,’ असा मौलिक संदेश त्यांनी दिला. जवळपास दोन तास चाललेल्या या सोहळ्यात प्रत्येक मंत्रोच्चारासोबत त्या चिमुरडीसाठी प्रार्थना केली जात होती.
---
समाजाला आरसा दाखवणारा ‘टी-शर्ट पॅटर्न’
यात्रोत्सवाचे यंदाचे सामाजिक भान केवळ विधीपुरते मर्यादित नव्हते; यात्रा समितीच्या सदस्यांनी परिधान केलेल्या विशेष टी-शर्टवर ‘मुलगी वाचवा’, ‘स्त्रीचा सन्मान करा’ आणि ‘अत्याचार थांबवा’ असे परखड संदेश झळकत होते. भक्तीच्या मार्गाने अन्यायाचा निषेध नोंदवण्याच्या या संवेदनशील कल्पनेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
---
आमदार विजयकुमार देशमुख यांचा गौरव
यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळी एका विशेष सोहळ्यात, मंदिराच्या सभामंडपासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार विजयकुमार देशमुख यांना मैंदर्गी मठाचे श्री म.नि.प्र. मृत्युंजय महास्वामीजी यांच्या हस्ते ‘श्री चौडेश्वरी सेवा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शहरातील १० माजी नगरसेवकांचाही सत्कार करण्यात आला.
---
भक्तिरसात न्हाली शुक्रवार पेठ
कुंकुमार्चनापूर्वी वैशाली यादवाड व भारती देशमुख यांनी आपल्या सुरावलींनी भक्तांना मंत्रमुग्ध केले. ‘शिवनु बंदानो, नम्मा हरनु बंदानो...’ तसेच ‘श्री संतान देवी बारं अम्मा...’ यांसारख्या भक्तिगीतांनी परिसरात चैतन्य निर्माण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT