Sharad Pawar
Sharad Pawar Sakal
पुणे

Sharad Pawar : शिक्षण आणि वैद्यकीय मदत क्षेत्रात ख्रिस्ती सामाज पहिल्या क्रमांकावर : शरद पवार

प्रफुल्ल भंडारी

दौंड : भारतातील शिक्षण आणि वैद्यकीय मदत या दोन महत्वाच्या क्षेत्रांमधील योगदानाचा आढावा घेतला तर ख्रिस्ती समाजाचे योगदान पहिल्या क्रमांकावर आहे. प्रभू येशू ख्रिस्त यांच्या सेवा प्रवृत्तीचा विचाराचे पालन करताना ख्रिस्ती समाजाने कोणतीही अपेक्षा न बाळगता उत्तम प्रकारे शिक्षण संस्था आणि आरोग्य केंद्रे उभारून ती उत्तम पध्दतीने चालविली आहेत, असा गौरवपूर्ण उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केला आहे.

दौंड शहरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे त्यांची कन्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आले होते. दौंड शहरातील नॅार्टन चर्च आणि श्री सिंधी धर्मशाळा समोरील चर्चला भेटी देत ख्रिस्ती बांधव आणि मातंग समाजबांधवांशी शरद पवार यांनी संवाद साधला. खासदार सुप्रिया सुळे व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, मणिपूर येथील स्थिती अत्यंत गंभीर असून महिलांवर अत्याचार झाले आणि समाजाचे दोन भाग झाले. मणिपूरच्या प्रकरणात केंद्र व राज्य सरकारची भूमिका ही अत्याचारग्रस्तांना आधार व संरक्षण देणारी आणि अत्याचार करणार्यांवर कारवाई करण्याची असायला हवी होती.

परंतु दुर्देवाने दोन्ही सरकारांनी ती जबाबदारी पार पाडलेली नाही. पंतप्रधान हे देशाच्या कानाकोपर्यात जातात परंतु ते मणिपूर मधील अत्याचारांचा उल्लेखही करीत नाही, याचा अर्थ ही प्रवृत्ती न्यायाची नाही. म्हणून जिथे जिथे अन्याय, अत्याचार आणि धर्मावर संकट उभे राहील तेथे या संकटग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम आम्ही निश्चित करू, असा विश्वास देतो.

मातंग समाजबांधवांच्या मागण्या शांतपणे एेकून घेत शरद पवार यांनी त्या बाबत आदर्श आचारसंहिता लागून असल्याने अधिक भाष्य न करता मागण्या पूर्ण करणे आणि समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

सुप्रिया सुळे यांना निवडून द्या : शरद पवार

दौंड येथे ख्रिस्ती व मातंग समाजबांधव आणि माजी सैनिकांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, तुम्ही तीन वेळा सुप्रिया सुळे यांना निवडून दिले आहे. लोकसभेतील कामगिरीच्या बाबत पहिल्या दोन खासदारांमध्ये सुप्रिया सुळे यांचे नाव असून ही कामगिरी आणि विकासाकरिता त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले. यंदाच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचे निवडणूक चिन्ह बदलल्याचे शरद पवार यांनी आवर्जून सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT