Lord Jesus
Lord Jesus sakal
पुणे

ख्रिस्ती बांधवांनी रविवारी झावळ्यांचा रविवार अर्थातच‘पाम संडे’साजरा केला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : होसन्ना... होसन्ना...! हे प्रभू येशू तू आमचे रक्षण कर ! असे म्हणत शहरातील ख्रिस्ती बांधवांनी रविवारी (ता. १०) झावळ्यांचा रविवार अर्थातच ‘पाम संडे’साजरा केला. यानिमित्त हातामध्ये नारळाच्या झाडाच्या झावळ्या घेऊन शांतता फेरी काढण्यात आली, त्याचबरोबर सामाजिक उपक्रमही राबविले.

गुड फ्रायडेच्या अगोदरचा रविवार ख्रिश्‍चन धर्मीय नागरिकांमध्ये झावळ्यांचा रविवार म्हणून साजरा केला जातो. चाळीस दिवसांच्या उपवासाला त्यांच्यामध्ये विशेष महत्त्व असते. गुड फ्रायडेनंतर येणाऱ्या रविवारला ईस्टर संडे म्हणतात. पाम संडे ते ईस्टर संडे पर्यंत पवित्र सप्ताहानिमित्त चर्चमध्ये ख्रिस्ती धर्मीयांचे धार्मिक कार्यक्रम आयोजिण्यात आले आहेत. प्रभू येशूने जेरुसलेममध्ये प्रवेश केल्यानंतर तेथील जनसमुदायाने हातात खजुराच्या झावळ्या घेऊन होसान्ना, होसान्ना अशा घोषणा दिल्या. या दिवसापासून ख्रिस्ती समाजाचा पवित्र सप्ताह सुरू होतो. या आठवड्यात ख्रिस्ती बांधव गुड फ्रायडे, मौदी गुरुवार, ईस्टर संडे, अंजिराचा सोमवार हे दिवस साजरे करतात. अशी माहिती चर्च ऑफ द होली नेम सी.एन.सी.चे सहसचिव सुधीर चांदेकर यांनी दिली.

चर्च ऑफ द होली नेम, ईम्यान्युअल चर्च, ख्राईस्ट चर्च, सेंट मेरी चर्च अशा विविध चर्चने मिरवणुका काढून ‘पाम संडे’ साजरा केला. यामध्ये धर्मगुरू सुधीर गायकवाड, सुरेंद्र लोंढे, मनोज काटे, चंद्रशेखर जाधव, फ्रान्सीस कसबे आदींनी सहभाग घेतला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

SRH vs RR : आज पडणार धावांचा पाऊस! जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या राजस्थान रॉयल्सशी हैदराबादचा सामना

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT