पुणे

पुणेकर पाळताहेत लॉकडाऊन; घराबाहेर पडण्याचे प्रमाण तुरळक

सकाळवृत्तसेवा

पुणे : पोलिसांनी सोमवारी मध्यरात्रीपासूनच ठेवलेला कडक बंदोबस्त, ठिकठिकाणी पोलिसांकडून होणारी कसून चौकशी आणि विनाकारण फिरणाऱ्यांवर केली जाणारी कारवाई, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे लॉकडाऊनच्या मंगळवारी पहिल्या दिवसाच्या दुपारपर्यंत शहरात नागरिकांनी घराबाहेर न पडण्यास प्राधान्य दिले. तर अत्यावश्यक कामे, पासधारक नागरिकांचे तुरळक प्रमाण रस्त्यावर दिसून आले. 

शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या 10 दिवसांच्या लॉकडाऊनला सोमवारी मध्यरात्रीपासून सुरुवात झाली. पोलिसांकडून मात्र सोमवारी सकाळपासूनच शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गावर नागरिकांची कसून चौकशी करण्यास, त्यांची नावे नोंदवून घेण्यास सुरुवात केली होती. तर सोमवारी रात्रीनंतर पोलिसांचा रस्त्यावरील वावर मोठ्या प्रमाणात वाढला. 

मंगळवारी पहाटेपासून दूध, औषधाची वाहने, उद्योग, कंपन्यामधील कामगार अधिकृत पास असणारे कामगार यांची तपासणी करुन त्यांना पुढे जाण्यास पोलिसांकडून सहकार्य केले जात होते. सकाळी सहा वाजल्यानंतर मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर फिरणाऱ्याना पोलिसांनी समज देत घरी माघारी पाठविले. तर विनाकारण फिरणाऱ्यांना टवाळखोरांना काठीचा प्रसाद देत त्यांना हाकलून देण्यात आले. तर लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करीत वाहने रस्त्यावर आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करीत कारवाईचा बडगा उगारण्यात आला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कात्रज, सिंहगड रस्ता, वारजे, चांदणी चौक, बालेवाडी, औंध, बोपोडी, विश्रांतवाडी, खराडी, चंदननगर, वडगाव शेरी, कल्याणीनगर, मगरपट्टा, हडपसर, फुरसुंगी, हडपसर अशा परिसरात प्रवेश करणाऱ्या 13 ते 15 ठिकाणी जादा पोलिस बंदोबस्त ठेवून तेथे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्याकडून ये-जा करणाऱ्या नागरिकांकडे पोलिस पास, कंपनीचे ओळख, कोणत्या कामासाठी घराबाहेर पडत आहेत, त्याबाबतच्या कागदपत्राची तपासणी करुन चौकशी केली जात होती. त्यानंतरच त्यांना पुढे सोडले जात होते. तर शहरातील प्रमुख रस्ते व अंतर्गत भागातील रस्त्यावर प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रमुख रस्ते, चौकात  पोलिसांकडुन बैरिकेड्स लावून नाकेबंदी करण्यात आली होती. घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांचे दुपारपर्यंत तुरळक प्रमाण होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
-----------------------------
बीट मार्शल व मोबाईल कारमधून पोलिसांकडुन घोषणा
एकीकडे नाकाबंदी करुन नागरीकांची रस्त्यावर तपासणी केली जात असताना, दूसरीकडे पोलिस ठाण्याचे बीट मार्शल पोलिस दुचाकीवर, तर वरिष्ठ पोलिस निरीक्षक व अन्य अधिकारी त्यांच्या वाहनामधुन आपापल्या हद्दीत गस्त घालत नागरीकांनी घराबाहेर पडु नये, असे आवाहन करीत होते.

(Edited By : Krupadan Awale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT