garbage burn
garbage burn sakal
पुणे

Kondhwa News : डोंगरालगत कचरा जाळल्याने नागरी आरोग्य धोक्यात

अशोक गव्हाणे

कोंढवा - येवलेवाडी पाझर तलावालगत डोंगराच्या बाजूला प्लास्टिक, रबर आदींचा कचरा जाळला जात आहेत. आग व धुराचे लोट उठून गुजर-निंबाळकरवाडी, टिळेकरनगर परिसरातील हवेचे प्रदूषण होत आहे. त्याचबरोबर, दुर्गंधी सुटत असून त्यामुळे नागरी आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर समस्येकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

येवलेवाडी पाझर तलावजवळ डोंगरालगत गेल्या तीन-चार महिन्यापासून कचरा, प्लास्टिक, रबर, स्क्रॅप व राडाराडा आणून टाकला जात आहे. तसेच तो पेटवून दिला जात आहे. डोंगरालगत असलेल्या खड्ड्यातुन आग व धुराचे लोट उठत असून येवलेवाडी, टिळेकरनगर, गुजर निंबाळकरवाडी पर्यायाने शहराकडे येत आहेत. सध्या थंडीमुळे धुराचे लोट उंच न जाता ठराविक उंचीपर्यंत राहतात त्यामुळे फार मोठे प्रदूषण होत आहे.

२४ तास हे धुराचे लोट वाहत असल्यामुळे परिसरातील प्रदूषण वाढत आहे. प्रदूषणाच्या तक्रारीनंतर अग्निशामक विभागाने आग विझवण्यासाठी दोन वाहने पाठवली. मात्र जागा मालकांनी कचऱ्याला लावलेली आग आटोक्यात आणू नका आम्ही ती आटोक्यात आणू असे सांगितल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

सोसायटीबाहेर किरकोळ कचरा पेटवला तरी सामान्य नागरिकांवर कारवाई होते. तसेच, आयुक्तांनी कचरा पेटवू नये अशा सूचना असताना राजरोसपणे मोठ्या प्रमाणात कचरा पेटवण्यास कुणाची संमती आहे? नागरिकांच्या जीवाला धोका असताना पालिका कुणाला पाठीशी घालत आहे, असा प्रश्न उपस्थित करत तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र पाडसात उमटतील असा इशारा माजी नगरसेवक प्रकाश कदम यांनी दिला आहे. तसेच, याबातीत कारवाई करण्यासंदर्भात पालिका आयुक्तांना निवेदन दिले असल्याचेही कदम यांनी सांगितले.

प्रतिक्रिया

सदर परिसरात पाहणी केली आहे. याबाबतीत पुढील काळात अधिकाऱ्यांमार्फत पाहणी करुन कडक दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

- मंगलदास माने, वरिष्ठ आरोग्य निरिक्षक, कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT