पुणे

भोर शहर तीन तासांत चकाचक

CD

भोर, ता. ३ ः डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी (ता. १) भोर शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. रविवारी सकाळी तीन तासांमध्ये प्रतिष्ठानच्या सदस्यांनी ३२ गाड्या कचरा गोळा केला. आणि त्याचे वर्गीकरण करून तो कचरा डेपोमध्ये जमा केला. रविवारी सकाळी साडेसात वाजता शहरातील चौपाटी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून स्वच्छता अभियानास सुरुवात झाली. प्रतिष्ठानच्या १२० सदस्यांनी हातात खोरे, झाडू, कचरा भरण्यासाठी पोती आणि बादल्या घेऊन स्वच्छतेस सुरुवात केली. प्रतिष्ठानच्या सदस्यांना नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील १२ कर्मचारी, नगरपालिका स्वच्छता अभियानाच्या ५ महिला कर्मचारी आणि नगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांनीही साथ दिली.
कचरा जमा करण्यासाठी व टाकण्यासाठी नगरपालिकेच्या ८ घंटागाड्या आणि प्रतिष्ठानच्या वतीने २ ट्रॅक्टरची सोय करण्यात आली होती. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष रामचंद्र आवारे, नगरसेवक गणेश पवार, अमित सागळे, जयवंत शेटे, सुमंत शेटे, कुणाल धुमाळ, प्रशांत जाधव नगरपालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख महेंद्र बांदल आदींसह शहरातील नागरिक उपस्थित होते.
सदस्यांनी पाच पथके तयार करून शहरातील रामबाग व प्राथमिक आरोग्य केंद्र, एसटी स्टॅन्ड, पोलिस ठाणे, शासकीय विश्रामगृह, भाजी मंडई परिसर, मंगळवार बाजारपेठ परिसर आणि शहरातील मुख्य रस्ते या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Rates : सोने दरात किरकोळ तर चांदीच्या दरात सलग तीन दिवस मोठी घसरण; आजचा भाव किती?

Latest Marathi News Live Update : लोणावळा घाटात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

Petrol Price Today : पेट्रोल-डिझेलचे नवे रेट जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे आजचा ताजा दर ?

Chhatrapati Sambhajinagar: आर्थिक वादातून तरुणाचा जीव घेतला ; तीन आरोपींना अटक

Chhatraati Sambhajinagar: शहरात फक्त चार दिवसांचा रक्तसाठा; टंचाईने जीव टांगणीला, थॅलेसेमिया रुग्णांना चार ते पाच दिवसांची वेटिंग

SCROLL FOR NEXT