पुणे

एल निनोमुळे वाढतो सशस्त्र संघर्षाचा धोका

CD

नवी दिल्ली, ता. १३ ः हवामानातील बदलांमुळे सशस्त्र संघर्षाचा धोका वाढतो का, या दीर्घकाळापासून चर्चिल्या जाणाऱ्या प्रश्नावर अमेरिकेतील ‘राईस युनिव्हर्सिटी’च्या नवीन संशोधनाने प्रकाश टाकला आहे. संशोधकांच्या मते, याचे उत्तर ‘हो’ असे असले तरी, हे परिणाम पूर्वीच्या समजापेक्षा अधिक सूक्ष्म आणि प्रादेशिक स्वरूपाचे आहेत.
प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ची स्थिती केवळ मॉन्सून किंवा हवामानावरच परिणाम करत नाही, तर जगभरात हिंसक संघर्ष आणि युद्धांचा धोका वाढविते, असा दावा संशोधकांनी केला आहे.
एल निनोमुळे प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते. ही स्थिती दर दोन ते सात वर्षांनी निर्माण होते.
एल निनो सक्रिय होतो तेव्हा हिंसेची शक्यता वाढत असल्याचे संशोधकांना आढळले.राईस युनिव्हर्सिटीतील सांख्यिकी विभागाचे संशोधक टायलर बॅगवेल, हवामान शास्त्रज्ञ सिल्व्हिया डी आणि सांख्यिकीशास्त्रज्ञ फ्रेडरी व्हिएन्स यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास करण्यात आला. ‘प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अकादमी ऑफ सायन्सेस’मध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
यासाठी अण्णा स्ट्राव्हाटो आणि दिव्या साईकुमार या विद्यार्थ्यांनी विविध भाषांमधील बातम्या आणि प्राथमिक स्रोतांचे विश्लेषण करून प्रत्येक घटनेची अचूक नोंद केली. या अभ्यासातील सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे, एल निनोच्या काळात जागतिक स्तरावर सशस्त्र संघर्षाचा धोका ला निनाच्या तुलनेत अधिक असतो. मात्र, हा धोका प्रामुख्याने अशा प्रदेशांमध्ये दिसून येतो जिथे एल निनोमुळे दुष्काळी स्थिती निर्माण होते. ज्या भागात एल निनोमुळे पाऊस पडतो, तिथे संघर्षाचा कोणताही ठोस संबंध आढळलेला नाही. दुष्काळामुळे निर्माण होणारी पाण्याची टंचाई आणि शेतीवर होणारा परिणाम हे घटक सामाजिक अस्थिरता आणि संघर्षाला कारणीभूत ठरत असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे.

संशोधन कसे केले?
संशोधकांनी १९५० ते २०२३ या काळातील ५०० हून अधिक संघर्षांच्या घटनांचा सखोल अभ्यास केला. हवामानातील मोठ्या बदलांमुळे नागरी संघर्ष आणि युद्धाची शक्यता कशी निर्माण होते, याचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी उच्च-रिझोल्यूशन डेटा आणि एम्पिरिकल मॉडेलिंगचा वापर केला. या संशोधनात ‘एल निनो-सदर्न ऑसिलेशन'' (ईएनएसओ) आणि ‘इंडियन ओशन डायपोल’ (आयओडी) या दोन प्रमुख हवामान प्रणालींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ईएनएसओ आणि आयओडीच्या अत्यंत तीव्र टप्प्याचे वेगवेगळे, परस्परविरोधी स्थानिक परिणाम दिसून येतात. असे बॅगवेल यांनी सांगितले. हे परिणाम तपासताना सशस्त्र संघर्ष आणि ईएनएसओ हा एल निनो स्थितीत होता की ला निना यांच्यातील सांख्यिकीय संबंध संशोधकांनी उलगडला. ला निनाच्या तुलनेत एल निनोमुळे जगात सशस्त्र संघर्षाची शक्यता अधिक असल्याचे संशोधकांना आढळले.


सशस्त्र संघर्षाचा हवामान बदलाशी संबंध आहे का, तसेच हे बदल स्थानिक हवामानावर किती तीव्रतेने प्रभाव टाकतात, त्यानुसार संघर्षाचा धोका वाढतो का, हे आम्हाला जाणून घ्यायचे होते. त्यामुळे, आम्हाला हवामानाधारित राजकीय किंवा सामाजिक अस्थिरतेला संवेदनशील असणारे प्रदेश ओळखण्यात मदत होईल.
- टायलर बॅगवेल, संशोधक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : ड्रग्स तस्करी प्रकरणातील वाँटेड आरोपी विरेंदर बसोयाला पुण्यात आणणार

SCROLL FOR NEXT