Coinex 2022 Exhibition Sakal
पुणे

Coinex Exhibition : दुर्मिळ नाण्यांचा खजिना असलेल्या ‘कॉईनेक्स पुणे २०२२’ प्रदर्शनाचे उद्घाटन

इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटम्स तर्फे (आयसीएसआरआय) आयोजित ‘कॉईनेक्स पुणे २०२२’ या राष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटम्स तर्फे (आयसीएसआरआय) आयोजित ‘कॉईनेक्स पुणे २०२२’ या राष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

पुणे - इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटम्स तर्फे (आयसीएसआरआय) आयोजित ‘कॉईनेक्स पुणे २०२२’ या राष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ संग्राहक आणि ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. राजन जयकर यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २३) करण्यात आले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून पुणेकरांसाठी दुर्मिळ नाण्यांचा खजिना खुला झाला आहे.

या प्रदर्शनात प्राचीन, मुघल, एरर अशी दुर्मिळ आणि प्राचीन नाणी, नाणक संग्राहकांची विविध विषयांवरील व्याख्याने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या काळात बनविल्या गेलेल्या नाण्यांपैकी होन हे ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे नाणे अशा वैविध्यपूर्ण नाण्यांचा समावेश आहे. हे प्रदर्शन कर्वे रस्ता येथील सोनल हॉल येथे येत्या रविवारपर्यंत (ता. २५) सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.

आयसीएसआरआयतर्फे दरवर्षी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. या प्रदर्शनाच्या उद्घाटना प्रसंगी आयसीएसआरआयचे अध्यक्ष किशोर चांडक, उपाध्यक्ष राजेंद्र शहा, सचिव शरद बोरा, खजिनदार नितीन मेहता आणि सहाय्यक सचिव श्‍याम मोटे उपस्थित होते. यावेळी अॅड. जयकर म्हणाले, ‘‘संग्रह करण्याचा छंद जोपासताना छोट्यात छोटा विषय निवडून सुरूवात करावी. संग्रह करण्यासाठी छोटा विषय निवडला असला तरी त्याच्या मुळापर्यंत जाणे आवश्यक असते. त्या विषयाची खोली, व्याप्ती याचाही अंदाज घेणे आवश्यक आहे.’’

कार्यक्रमात संस्थेच्या स्मरणिकेचे आणि महम्मद इस्लामी लिखित 'अ लिगसी ऑफ बहामनी सुलतानस् थ्रू द कॉइम्स' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच नाणकशास्त्र क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल दिवंगत विजय अग्रवाल यांना (मरणोत्तर), डॉ. पद्माकर प्रभुणे, बडोत येथील अशोक कुमार जैन आणि मुंबईचे अशोक झुनझुनवाला यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. दिवंगत विजय अग्रवाल यांचा पुरस्कार सविता अग्रवाल यांनी स्वीकारला. आयसीएसआरआयचे गुणवंत शहा आणि मधुसुदन घाणेकर यांच्या संग्रहांची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT