Cold
Cold 
पुणे

पुण्यात अवघ्या चार दिवसांत गारठा वाढला!

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुण्यात अवघ्या चार दिवसांत गारठा वाढला आहे. या दरम्यान किमान तापमानाचा पारा ६.३ अंश सेल्सिअसने घसरला. त्यामुळे पुण्यात शेकोट्या पुन्हा पेटल्याचे चित्र दिसत होते. शहरात शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमानाचा पारा ११.९ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाल्याची नोंद हवामान खात्याकडे झाली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या स्थितीमुळे गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे दिवसाच्या तापमानाचा पारा कमी झाला होता, तर रात्रीच्या तापमानाचा पारा वाढला होता. मंगळवारी (ता. १) किमान तापमान सरासरीपेक्षा ५.५ अंश सेल्सिअसने वाढून १८.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा पारा घसरत होता. दरदिवशी रात्री हवेतील गारठा वाढत होता. गेल्या काही दिवसांनंतर प्रथमच किमान तापमान सरासरीपेक्षा कमी झाले. किमान तापमान सरासरीपेक्षा शुक्रवारी ०.५ अंश सेल्सिअसने कमी झाल्याची नोंद हवामान खात्यात झाली. 

पुढील दोन दिवसांत हवेतील गारठा कायम रहाणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असल्याने किमान तापमानाचा पारा १२ ते १३ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदला जाईल. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव पुन्हा वाढण्याची शक्‍यता निर्माण होत आहे, असेही हवामान तज्ज्ञांनी सांगितले. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT