ganja  sakal
पुणे

Pune Crime : महाविद्यालयाजवळ पानटपरीत गांजा विक्री करणाऱ्यास अटक

कर्वेनगर येथील एका महाविद्यालयाच्या परिसरात पानटपरीत गांजा आणि भांगेच्या बंटा गोळ्या विक्री करणाऱ्या पानटपरीचालकास गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कर्वेनगर येथील एका महाविद्यालयाच्या परिसरात पानटपरीत गांजा आणि भांगेच्या बंटा गोळ्या विक्री करणाऱ्या पानटपरीचालकास गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली.

रामबाबू देवनारायण महातो (वय ३१, सध्या रा. कॅनॉल रस्ता, कर्वेनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महातो हा मूळ बिहार राज्यातील सातावाडी जिल्ह्यातील रोहुवा येथील रहिवासी आहे. त्याची कर्वेनगरमधील कॅनॉल रस्ता परिसरात महाविद्यालयाजवळ पानटपरी आहे.

महातो हा पानटपरीत गांजा आणि बंटा गोळ्यांची विक्री करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यावरून पोलिसांनी छापा टाकून ११० ग्रॅम गांजा, तीन किलो ५१५ ग्रॅम बंटा गोळ्या असा ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्या सूचनेनुसार अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT