डॉ. रेड्डी sakal
पुणे

संरक्षण तंत्रज्ञानाच्या ‘इकोसिस्टम’साठी कटीबद्ध

डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. रेड्डी; विद्यापीठात संरक्षण तंत्रज्ञानात पदविका

सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशाची आत्ताची परिस्थिती पाहता संरक्षण तंत्रज्ञानातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाची खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे. स्वदेशी तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्र नव्या उंचीवर पोचले असून, त्यासाठी आवश्यक ‘इकोसिस्टम’ निर्माण करणे आवश्यक आहे. या अंतर्गतच देशभरात जवळपास ५०० विद्यार्थ्यांना संरक्षण क्षेत्रात संशोधन (पीएच.डी.) करता येणार आहे, अशी माहिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे अध्यक्ष (डीआरडीओ) डॉ. जी.सतीश रेड्डी यांनी दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संरक्षण व सामरिकशास्त्र विभागामध्ये संरक्षण तंत्रज्ञानात पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. यावेळी विद्यापीठाचा विभाग आणि ‘इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स सायंटिस्ट अँड टेक्नॉलॉजिस्ट' (आयडीएसटी) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात डॉ. रेड्डी बोलत होते. कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे, संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्थेचे कुलगुरू डॉ. सी.पी.रामनारायण, आयडीएसटी चे अध्यक्ष डॉ. सी.एल.धामेजनी उपस्थित होते. डॉ. उमराणी म्हणाले, ‘‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थ्यांना पारंपरिक अभ्यासक्रमाबरोबर नवनवीन अभ्यासक्रम देण्यात कायमच अग्रेसर आहे. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना या क्षेत्राकडे वळण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळेल.’’

"गेल्या काही वर्षात संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारतात मोठी होत आहे. संरक्षण मंत्रालयाकडून यासाठी संरक्षण विषयातील शिक्षणावर भर दिला जात असून यातून कौशल्य असणारे मनुष्यबळ निर्माण करण्यात येणार आहे. सध्या दोन हजाराहून अधिक उद्योग या कामात आहेत. तर एक हजाराहून अधिक ‘स्टार्टअप’ संरक्षण विषयात विकसित होत आहेत."

- डॉ. डी. सतीश रेड्डी, अध्यक्ष, डीआरडीओ

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये :

  • पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिफेन्स टेक्नॉलॉजी

  • कालावधी- एक वर्ष

  • पात्रता- अभियांत्रिकी किंवा विज्ञान विषयातील पदवीधर

  • सेमिस्टर - दोन

  • श्रेयांक- ३२

अधिक माहिती- www.unipune.ac.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल; मोहोळ यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

SCROLL FOR NEXT