कान्हे फाटा - सामुदायिक विवाह सोहळ्यात गप्पांमध्ये रंगलेले (डावीकडून) बाळा भेगडे, अजित पवार, श्रीरंग बारणे व दिगंबर भेगडे.
कान्हे फाटा - सामुदायिक विवाह सोहळ्यात गप्पांमध्ये रंगलेले (डावीकडून) बाळा भेगडे, अजित पवार, श्रीरंग बारणे व दिगंबर भेगडे. 
पुणे

सामुदायिक विवाहात राजकीय सलोखा

सकाळवृत्तसेवा

तळेगाव स्टेशन - लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत कान्हे फाटा येथे मावळ प्रबोधिनीतर्फे सामुदायिक विवाह सोहळा बुधवारी सायंकाळी झाला. त्यात १३५ जोडप्यांची लग्नगाठ बांधली जाण्याबरोबरच राजकीय सलोख्याचे दर्शन घडले.

अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेवलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असलेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी वेळात वेळ काढून या विवाह सोहळ्यास हजेरी लावली. प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची लाखोली वाहणारे सर्वपक्षीय नेते लग्नसोहळ्यानिमित्त व्यासपीठावर मांडीला मांडी लावून गप्पा मारत होते. त्यामुळे लग्नसोहळ्याला उपस्थितांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला.

आगामी विधानसभेसाठी भाजपकडून इच्छुक रवींद्र भेगडे यांनी या विवाह सोहळ्याचे संयोजन केले होते. पुत्राच्या प्रचारासाठी मावळात तळ ठोकून असलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व मावळचे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे हे दोघे राजकीय मतभेद विसरून शेजारी बसून गप्पा मारताना दिसले. पलीकडे माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या शेजारी बसलेले भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी मात्र हात बांधत गप्प बसून राहणेच पसंत केले. लग्नातील अनावश्‍यक खर्चाला फाटा देत गरजू जोडप्यांची विनामूल्य लग्नगाठ बांधणाऱ्या या सामुदायिक विवाह सोहळ्यात राजकीय सलोख्याचे वेगळेच दर्शन घडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT