पुणे

नगर रस्त्यावरील कारखाने उद्यापासून होणार सुरु?

सकाळवृत्तसेवा

कोरेगाव भीमा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगर रस्त्यावर शिरुर हवेलीतील औद्योगिक वसाहतीतील बंद असलेले कारखाने उद्यापासून सुरु होणार की नाही, याबाबत स्थानिकांच्या मनात संभ्रम आहेत. तसेच याबाबत जिल्हा प्रशासनाकडूनही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. नगर रस्त्यावरील काही कारखाने उद्यापासून मर्यादित स्वरुपात सुरू होणार असल्याची माहिती डेक्कन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजचे अध्यक्ष प्रकाश धोका यांनी दिली आहे. मात्र, कोविड १९ बाबत शासनाने दिलेले सर्व नियम निकष पाळूनच मर्यादित स्वरूपात कारखाने चालवण्यात येणार असल्याचे धोका यांनी यावेळी स्पष्ट केले.

नगर रस्त्यावर शिरूर हवेली तालुक्यात केसनंद सणसवाडी शिक्रापूर कोंढापुरी रांजणगाव कारेगाव व शिरूर परिसरात अनेक मोठे उद्योग तसेच त्यावर अवलंबून असलेले छोटे उद्योग मोठ्या संख्येने आहेत. त्यातील अनेक कामगार हे पुण्यातून ये-जा करत असतात. मात्र, सद्यस्थितीत पुण्यातल्या कामगारांऐवजी हॉटस्पॉट नसलेल्या क्षेत्रातील किंवा स्थानिक कामगारांच्या मदतीने योग्य काळजी घेऊन मर्यादित स्वरूपात कारखाने चालवण्यात येणार असल्याची धोका यांनी सांगितले.

यामध्ये मर्यादित कामगार संख्येत कारखासने चालवणे, कामगारांनी सक्तीने मास्क वापरणे, स्वच्छ हात धुणे, योग्य ते सोशल डिस्टन्स राखणे तसेच सार्वजनिक ठिकाणांची सातत्याने स्वच्छता करणे, वाहनांची स्वच्छता करणे, येणाऱ्या कच्च्या मालाची योग्य ती स्वच्छता करणे यासह सर्वतोपरी काळजी घेण्यात येणार असल्याचेही धोका यांनी स्पष्ट केले.

कोरोनासोबत योग्य ती काळजी घेत असताना कारखाने पूर्ण बंद ठेवणे, हाही पर्याय योग्य नसल्याने कामगारांची उपासमार होऊ नये, याबाबतही योग्य ती काळजी घेणे आवश्यक असल्याचे धोका यांनी सांगितले.

दरम्यान, उद्यापासून कारखाने चालू होणार आहेत किंवा नाही. असल्यास काोठून कामगार व कसे येणार? याबाबत स्थानिक ग्रामपंचायती तसेच ग्रामस्थांना मात्र माहिती नसल्यामुळे संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, कारखाने चालू झाल्यास कोरोणाचा धोका वाढणार असल्याची चिंताही स्थानिक ग्रामपंचायत कारभारी व नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT