बाजीराव रस्ता - ऊसतोडणी कामगारांच्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी रविवारी काढलेला कॅंडल मार्च.
बाजीराव रस्ता - ऊसतोडणी कामगारांच्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी रविवारी काढलेला कॅंडल मार्च. 
पुणे

स्पर्धा परीक्षार्थींचा कॅंडल मार्च (व्हिडिओ)

सकाळवृत्तसेवा

पुणे - सामाजिक भान अन्‌ ज्वलंत विषय घेऊन रविवारी हजारो स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरले. महिला अत्याचारासारख्या गंभीर विषयाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे विद्यार्थी एकवटले होते. भिडे पूल ते शनिवारवाडा यादरम्यान त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने कॅंडल मार्च काढत मुळशीतील कासारसाई येथे ऊसतोडणी कामगारांच्या मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेध केला.

ऊसतोडणी कामगारांच्या दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना नुकतीच घडली. या घटनेतील एका मुलीचा मृत्यू झाला. तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या घटनेतील आरोपींवर कडक कारवाई व्हावी, यासाठी या विद्यार्थ्यांनी कॅंडल मार्च काढला. हा खटला जलद गती न्यायालयात चालवून आरोपींना सहा महिन्यांत फाशीची शिक्षा द्यावी, पीडित मुलीच्या शिक्षणाची आणि कुटुंबीयांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सरकारने घ्यावी, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. शिस्तबद्ध पद्धतीने काढलेल्या या मार्चने सर्वांचे लक्ष वेधले. 

महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, आरोपींना लवकरात लवकर शिक्षा होत नाही. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व पीडित मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही एकत्र आलो. अशा घटनांकडे सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे. 
- डॉ. तेजस्विनी गुंडाळे, मार्चच्या समन्वयिका 

काही अत्याचाराच्या घटना लोकांसमोर येत नसल्यामुळे त्यातील आरोपींना शिक्षा होत नाही. अशा घटना समोर येऊन आरोपींवर कडक कारवाई 
होणे गरजेचे आहे. यातूनच महिलांना न्याय मिळू शकेल आणि इतरांना त्यातून धडा मिळेल. 
- माधुरी पाटील आणि मंजिरी जंगिलवाड, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

IPL 2024: ईशान किशनला BCCI चा दणका, दिल्ली-मुंबई सामन्यानंतर केली मोठी कारवाई

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

SCROLL FOR NEXT