Complete the RTE admission process Demand by AAP and Socialist Right to Education meeting 
पुणे

आरटीई प्रवेश प्रकियेस होतोय उशीर, पालक झाले अस्वस्थ; 'आप'ने केली 'ही' मागणी

सकाळवृत्तसेवा

पुणे : शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायद्यातील २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेशाची प्रक्रिया ठप्प असल्याने पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाने ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी आणि या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आम आदमी पक्षाने व अखिल भारतीय समाजवादी  शिक्षण हक्क सभेने केली आहे. 

- पुणेकर खवय्यांसाठी 'थोडी खुशी थोडा गम'; वाचा महत्त्वाची बातमी
ज्या शासनाकडून आरटीई प्रवेश प्रक्रियेस उशीर झाला आहे. राखीव जागांची सोडत काढल्यानंतर कोरोनामुळे कागदपत्रांची पडताळणी होऊ शकली नाही. आता सर्व खाजगी शाळांची खुली प्रवेश प्रक्रिया संपली असून राज्य बोर्डाच्या शाळांचे प्रवेश सुद्धा संपत आले आहेत. त्यामुळे आरटीई मधून प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करणारे पालक अस्वस्थ झाले आहेत. राज्यातील एक लाख पाल्य शासनाच्या निर्णयाची वाट पहात आहेत. प्रतीक्षा यादीतील पालकांपुढे काय करावयाचे असा मोठा प्रश्न उभा आहे. आर्थिक अडचणीत असताना प्रवेश कुठे घ्यावा या विषयी संभ्रम आहे, त्यामुळे ही प्रक्रिया त्वरीत सुरू करून प्रवेश निश्चित करावेत. शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे, या विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आपचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सभेचे अध्यक्ष जयवंत ठाकरे म्हणाले, "२५ टक्के प्रवेशासाठी मार्च महिन्यात सोडत काढण्यात आली आहे, त्याचे मेसेज पालकांना आले आहेत. शाळांनी खुल्या वर्गातील प्रवेश ऑनलाईन सुरू केले असले तरी आरटीईची प्रक्रिया कोरोना मुळे ठप्प झाली. आपल्या मुलांचा प्रवेश होणार की नाही या विचाराने पालक चिंतेत आहेत." 

Video : कोरोना योद्धा म्हणायचं अन् पगार कपात करायचा?; पुण्यात नर्सेसचे आंदोलन
सुरेखा खरे म्हणाल्या, "लाॅकडाऊन मुळे हातावर पोट असणारे घरी बसले आहेत, यंदाची स्थिती वेगळी आहे. पण शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रक्रिया होत नाही. यावप लवकर निर्णय घ्यावा."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee TMC Resignation : ममता बॅनर्जींना तगडा झटका; अत्यंत विश्वासू चंद्रिमा भट्टाचार्य यांनी तृणमूल पक्ष प्रमुख पदाचा दिला राजीनामा

Mumbai News: रेल्वेचे दावे कोरडे, डबे मात्र ओले! लोकलच्या छतातून पाण्याचा वर्षाव; रेल्वे प्रशासनावर टीकेचा भडिमार

आधी गाडण्याची तयारी केली, नंतर पतीची हत्या; ४५ दिवसांनी पत्नीचं कांड समोर

Latest Marathi Live Update: सायन पनवेल महामार्गासह प्रमुख मार्गांवर वाहतुकीचा खोळंबा

Malvan Teacher Transfer : मालवणमध्ये 5 दिवसांपासून शाळा बंद! चांगल्या शिक्षकाच्या बदलीने पालक संतापले; 'त्या' शिक्षकाला परत रुजू न केल्यास दाखले काढून घेण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT