पुणे

ग्रीन बिल्डिंगची संकल्पना प्रत्यक्षात यावी - देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा

आगामी काळात बांधकाम प्रकल्प उभारताना बांधकाम व्यावसायिकांनी हरित प्रकल्पाच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवावे.

पुणे - ‘आगामी काळात बांधकाम प्रकल्प (Construction Project) उभारताना बांधकाम व्यावसायिकांनी हरित प्रकल्पाच्या (Green Project) संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवावे आणि मोठे प्रकल्प उभारताना किमान सुक्या कचऱ्याची (Garbage) विल्हेवाट लावण्याचे नियोजन करावे,’ असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले.

पटवर्धन बागेत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानालगत एरंडवण्यातील रावेतकर ग्रुप, संजीवनी ग्रुप आणि खर्डेकर यांच्या संयुक्तिक पार्क साइड रेसिडेन्सेस या पहिल्या २३ मजली बांधकाम प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. या वेळी रावेतकर ग्रुपचे अमोल रावेतकर, संदीप खर्डेकर, संजीवनी ग्रुपचे संजय देशपांडे आणि प्रवीण घाडगे यांच्या हस्ते फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्वागत करण्यात आले.

बांधकाम व्यावसायिकांचा शहर विकासात मोठा सहभाग असल्याचे पाटील यांनी या वेळी सांगितले.

या वेळी बांधकाम व्यावसायिक पंचशील ग्रुपचे अतुल चोरडिया, अमनोरा टाउनशिपचे अनिरुद्ध देशपांडे, ग्लोबल ग्रुपचे संजीव अरोरा, शिक्षण क्षेत्रातील पी. डी. पाटील, वेस्टर्न इंडिया फोर्जिंगचे अरुण जिंदल, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष एस. आर. कुलकर्णी, विद्यमान अध्यक्ष नंदू घाटे, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, योगेश टिळेकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suchrita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

घर का न घाट का... उन्मुक्त चंदच ड्रीम झालं उद्ध्वस्त! गुजराती खेळाडू बनला World Cupमध्ये अमेरिकन संघाचा कर्णधार

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT