alandi
alandi 
पुणे

आळंदीत मंदिर प्रदक्षिणेने आषाढी वारी सोहळ्याची सांगता

विलास काटे

आळंदी (पुणे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीमुळे एकादशीनिमित्त मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत माउलींचा मुखवटा पालखीत ठेवून मंदिर प्रदक्षिणा केली. दिंडीकऱ्यांची हजेरी आणि नारळप्रसादाच्या वाटपानंतर आषाढी वारी सोहळ्याची सांगता झाली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आळंदी ते पंढरपूर पायी वारी सोहळा रद्द झाला होता. त्यानंतर सरकारच्यावतीने बसद्वारे माउलींच्या पादुका ३० जूनला आळंदीतून पंढरपूरहून नेण्यात आल्या. आषाढी एकादशी आणि द्वादशी केल्यानंतर माउलींचा सोहळा आळंदीत परतल्यानंतर माउलींच्या पादुका कारंजे मंडपात विराजमान केल्या होत्या. आज पहाटे माउलींच्या समाधीवर विधीवत पवमान अभिषेक झाला. 

आज एकादशीनिमित्त समाधी मंदिर गाभारा आकर्षक फुलांनी सजविला होता. दुपारी साडेबाराला माउलींना नैवद्य दाखविल्यानंतर मंदिर प्रदक्षिणेची तयारी सुरू झाली. माउलींचा चांदीचा मुखवट्यास तुळशीच्या हार घालण्यात आला. आकर्षक फुलांनी सजविलेल्या पालखीत माउलींचा मुखवटा ठेवण्यात आला. टाळ मृदंगाचा निनाद आणि माउलीनामाचा गजर करत पालखी विणा मंडपातून मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडली. या वेळी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड. विकास ढगे, डॉ. अभय टिळक, बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, राजाभाऊ चौधरी, राहुल जोशी, राहूल चिताळकर, ज्ञानेश्वर वीर, अमोल गांधी आदी उपस्थित होते. 

मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर मुक्ताबाई मंडपात दिंडीक-यांच्या हजेरी आणि नाईक कुटुंबियांच्यावतीने दिंडीकऱ्यांना मानाचा नारळप्रसाद दिला. त्यानंतर माउलींच्या समाधी मंदिरात मुख्य गाभा-याजवळ देवस्थानचे मानकरी, दिंडीकरी यांना देवस्थानच्यावतीने मानाचे नारळप्रसाद वाटप करण्यात आले. त्यानंतर पालखी सोहळ्याची परंपरेने सांगता झाली.
 
Edited By : Nilesh J shende

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT