congress.jpg
congress.jpg 
पुणे

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढी विरोधात पुणे काॅंग्रेस मैदानात

सकाळवृत्तसेवा

विश्रांतवाडी (पुणे) : पुणे शहर काँग्रेस कमिटी
वडगावशेरी मतदार संघ काँग्रेस कमिटी यांच्या वतीने पेट्रोल व डिझेल दरवाढ झाल्याने भाजप सरकार विरोधात आज सकाळी येरवडा येथील गुंजन चौकात आंदोलन करण्यात आले. आंदोलनात पुणे शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष रमेश बागवे, महाराष्ट्र काँग्रेस सरचिटणीस अभय छाजेड, मा. नगरसेवक राजेंद्र शिरसाठ, संतोष आरडे, बाबा नायडू, नागेश भालेराव, ज्येष्ठ नेते प्रकाशमामा काळे, पुणे शहर सांस्कृतिक विभाग अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, महाराष्ट्र उपाध्यक्ष भुजंग लव्हे, पुणे शहर मीडिया अध्यक्ष डॉ. अनिस खान, सुनील थोरात, योगेश देवकर अदी मान्यवर उपस्थित होते.

आंदोलनात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून रिक्षा व मोटार सायकल ढकलून निषेध करण्यात आला.
या प्रसंगी पेट्रोल व डिझेलची भाववाढ रद्द केली नाही. तर केंद्र सरकार विरोधात पुणे शहरात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पुणे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी दिला. आंदोलनाचे नेतृत्व वडगावशेरी मतदार संघ (येरवडा ब्लॉक अध्यक्ष) रमेश सकट यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ओडिशातील लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची काँग्रेसकडून यादी जाहीर

SCROLL FOR NEXT