Milk
Milk Sakal
पुणे

शेतकऱ्यांना दिलासा! दुधाच्या खरेदी दरात ३ रुपये तर विक्री दरात २ रुपयांची वाढ

सकाळ वृत्तसेवा

दूधाची वाढती मागणी व कमी उत्पादन लक्षात घेता दुधाच्या खरेदी दरात ३ रुपये तर विक्री दरात २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

कात्रज - दूध पावडर (Milk Powder) व बटर यांचे वाढलेले दर त्यामुळे दूधाची (Milk) वाढती मागणी व कमी उत्पादन लक्षात घेता दुधाच्या खरेदी दरात ३ रुपये तर विक्री दरात २ रुपयांची वाढ (Increase) करण्यात आली आहे. कात्रज डेअरी (Katraj Dairy) येथे दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत चर्चा होऊन दूध खरेदी दरात वाढ झाल्याने दूध विक्रीदर वाढविणे क्रमप्राप्त झाल्याने विक्री दरात देखील वाढ करण्याचा विचार झाला. मात्र, ग्राहकांवरील दरवाढीचा बोजा कमी व्हावा या हेतूने विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ करुन विक्री कमिशन कमी करुन तसेच खर्चात बचत करुन एक रुपयाचा बोजा डेअरी व्याववसायिकांनी सोसावा असा निर्णय घेण्यात आला आहे.

पशुखाद्य, इंधन दरात झालेली वाढ यामुळे दूध उत्पादक शेतकर्‍यांना दूध व्यवसाय करणे अडचणीचे झाले आहे. या पार्श्वभूमीवर दूध-खरेदी विक्रीच्या दराबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती कात्रज डेअरीचे कार्यकारी संचालक विवेक क्षीरसागर यांनी दिली. दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत महानंद, चितळे, गोवर्धन, गोविंद, ऊर्जा, शिवामृत, कात्रज, राजहंस, स्फुर्ती, सोनाई, शिवप्रसाद, नेचर डिलाईट, रिअल डेअरी, एस. आर. थोरात, अनंत, संतकृपा, सुयोग इत्यादी सहकारी व खाजगी दूधव्यावसायिकांचे ४७ प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी गोपाळराव म्हस्के यांची पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल, रणजित देशमुख यांची संगमनेर तालुका दूध संघाचे अध्यक्षपदी निवड झाल्याद्दल तसेच संजीवराजे निंबाळकर यांची श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कल्याणकारी संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: कर्नाटकात 28 जागांपैकी आम्ही 25 जागा जिंकणार- बीएस येडियुरप्पा

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

SCROLL FOR NEXT