नरेंद्र मोदी 
पुणे

पुण्यात ‘मोदीभक्ता’ने उभारलं 'नमो' मंदिर

अश्विनी केदारी जाधव

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या दिवशी पुण्यात चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. पुण्यातील औंध गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंदिराची स्थापना केली आहे. या मंदिरात मोदी यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. मोदींच्या कार्यावर आधारित काव्याची रचना करून तीही येथे मोठ्या फलकावर झळकावण्यात आली आहे. मोदींचे हे पुण्यातील पहिलेच मंदिर असून, देशपातळीवरही या प्रकारचे पहिलेच मंदिर असल्याचा दावा केला जातोय.

मोदी यांचं मंदिर उभारणाऱ्या भाजप कार्यकर्त्याचं नाव मयूर मुंडे असं आहे. त्यांनी स्वतःची मालकी असलेल्या जागेत मोदी यांचं मंदिर उभारले आहे. मंदिरावरून ट्रोल केलं गेलं तरी चालेल पण मोदींकडून आपल्याला प्रेरणा मिळते त्यासाठी मंदीर उभारल्याची प्रतिक्रिया मयूर मुंडे यांनी दिली.

औंध येथील ॲड. मधुकर मुसळे यांच्या संकल्पनेतून मोदी यांचं मंदिर उभारण्यात आलं. दिवानशु यांनी हा पुतळा तयार केला असून यासाठी एक लाख 60 हजार रुपये खर्च झाले आहे. 15 ऑगस्ट 2021 रोजी औंधमधील ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. मंदिरासमोर मयूर मुंडे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यावर रचलेली कविता ‘मोदी भक्तां’साठी लावण्यात आली आहे. मंदिराबाहेर असलेल्या फलकावर आतापर्यंत मोदींनी केलेल्या कामाचा उल्लेख कवितेच्या आधारे ही मांडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेसेनेला पुन्हा मोठा धक्का! महिनाभरात अजून एका बड्या नेत्याचं पद रद्द; राजकीय समीकरणं बदलणार

बाईकस्वारावर झाडाची फांदी कोसळली, थेट कोमात; रस्त्यातच घडला भीषण प्रकार, पाहा VIDEO

Daryabhavani: स्वराज्याच्या इतिहास उलगडणार! शिवरायांच्या जलझुंजाची गाथा नववर्षी प्रदर्शित होणार; तारीख आली समोर

Latest Marathi News Live Update : बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंची युवासेना आक्रमक

आनंद शिंदेंच्या आवाजातील 'गोमु सासरला जाते' गाण्याचा धुमाकूळ; 'भुतम भयम'मधील गावरान ठसक्यातील गाणं ऐकलंत का?

SCROLL FOR NEXT