Forest Department esakal
पुणे

Forest Department : खिरेश्वर येथे वनविभागाच्या वतीने पर्यावरण शुल्क नाक्याची उभारणी

वनसंपदेचे रक्षण, सुरक्षित पर्यटन व गावाचा शाश्वत विकास व्हावा यासाठी वन विभागाचा निर्णय

पराग जगताप

ओतूर : खिरेश्वर ता.जुन्नर व किल्ले हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेली विविध पर्यटन स्थळे अडराई, काळु धबधबा, प्राचीन नागेश्वर मंदिर, पिंपळगाव जोगा धरण क्षेत्र येथे पर्यटक, ट्रेकर्स, निसर्गा अभ्यासक हे मोठ्या संख्येने पावसाळ्यात फिरायला व ट्रेकिंग साठी येत असतात. या कालावधीत सदर पर्यटन स्थळी अनुचित प्रकार घडू नये, वनसंपदा सुरक्षित रहावी तसेच सुरक्षित व जबाबदार पर्यटन होऊन खिरेश्वर गावचा पर्यटनाच्या माध्यमातून शाश्वत विकास व्हावा या उद्देशाने जुन्नर वनविभागाच्या वतीने शुुुक्रवारी ता.१२ जुुुलैल रोजी खिरेश्वर येथे खुबी बंधारावर वनविभाग जुन्नर व संयुक्त वनव्यवस्थापन समिती खिरेश्वर यांच्या मार्फत पर्यावरण शुल्क नाका सुरू करण्यात आला आहे.

जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या संकल्पनेतून सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे, ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांच्या उपस्थित हा पर्यावरण शुल्क नाका सुरू करण्यात आला. याप्रसंगी संयुक्त वन व्यवस्थापन समिती खिरेश्वरचे अध्यक्ष देवराम मेमाने,खिरेश्वर सरपंच विजय काठे, उपसरपंच कुसुम कवठे, पोलीस पाटील अभिजित भोरले, वनपाल आर.डि.गवांदे, वनरक्षक कोमल डाखोरे , वनरक्षक आर.के.फुलवड तसेच वन कर्मचारी,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT