construction permission process should have system demand to vikram kumar pmc esakal
पुणे

Pune News : गावठाणातील बांधकामाच्या फाइल मंजुरीसाठी २० टेबलांवर फाइलचा प्रवास

बांधकाम मंजुरीची प्रक्रिया सुटसुटीत करावी अशी मागणी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली

सकाळ वृत्तसेवा

Pune News : मध्यवर्ती पेठांमध्ये व गावठाणात बांधकाम करताना साइड मार्जीनमध्ये सवलत देण्यात आली आहे. पण बांधकामाची फाइल दाखल झाल्यापासून ते अंतिम मान्यतेपर्यंत जवळपास २० टेबलांवर फाइलचा प्रवास होतो.

यात खूप वेळ जात असल्याने किचकट प्रक्रियेमुळे एकाही फाइल मंजूर झालेली नाही. त्यामुळे बांधकाम मंजुरीची प्रक्रिया सुटसुटीत करावी अशी मागणी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे यांनी ही मागणी केली आहे. गावठाण आणि पेठांमध्ये बांधकाम करताना साइड मार्जिन सोडावे लागत होते. येथील जागेचा आकार कमी असल्याने साइड मार्जिनची अट शिथिल करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती.

अखेर शासनाच्या आदेशानुसार महापालिका आयुक्तांनी शुल्क आकारून सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाड्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. पण बांधकाम विभागाने फाइल मंजुरीची प्रक्रिया अतिशय किचकट केली आहे.

पेठ निरीक्षकाच्या सहाय्यकाकडनं निवेदन लिहून घेणे त्यानंतर बांधकाम निरीक्षक, उपअभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, नगर अभियंता यांची स्वाक्षरी घ्यावी लागते. त्यानंतर ती फाइल सावरकर भवन येथे आवक नोंदीसाठी पाठवली जाते.

तेथून दक्षता विभागाकडे पाठवली जाते. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त (जनरल) यांची स्वाक्षरी झाल्यानंतर आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवली जाते. तेथे स्वाक्षरी झाल्यानंतर पुन्हा याच पद्धतीने फाइलचा उलटा प्रवास सुरू होतो. यामध्ये जवळपास २० टेबलवर ही फाइल थांबते. त्यामुळे वेळेचे अपव्यय होत आहे. आत्तापर्यंत एकही प्रस्ताव मंजूर झालेला नाही. त्यामुळे या प्रक्रिया सुधारणा करून यातील क्लिष्टता कमी करावी, असे केसकर यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Flood Update : कोल्हापूर जिल्ह्यातील १० तालुक्यांच्या पूरस्थितीचा आढावा, काय सुरू काय बंद; जाणून घ्या एका क्लिकवर

BIG UPDATE ON TEAM INDIA: श्रेयस अय्यरच्या खांद्यावर बंदूक अन् रोहित शर्माची विकेट! BCCI च्या चक्रव्यूहात अडकणार हिटमॅन

JM Road History : ५० वर्षांत एकही खड्डा नाही... जंगली महाराज रस्त्याचा मास्टर इंजिनीअर कोण? काय आहे इतिहास?

Stock Market Opening: शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी 25,100 च्या वर, कोणते शेअर्स वाढले?

Pune News : एकतानगरीत परिस्थिती नियंत्रणात, महापालिकेकडून २४ तास यंत्रणा सज्ज; जवानही तैनात

SCROLL FOR NEXT