पुणे

सासवडमधील दोन कामगारांना तांब्याचे पाईप चोरीप्रकरणी अटक

CD

सासवड, ता. १३ : सासवड (ता. पुरंदर) येथील किर्लोस्कर कंपनीतून तांब्याचे पाईप कापून चोरी करणाऱ्या दोन कामगारांना सासवड (ता. पुरंदर) पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून ५४ हजार ७५६ रुपये किमतीचा १३ किलो ५०० ग्रॅम वजनाचा तांब्याचा मुद्देमाल जप्त केला आहे.
​या प्रकरणी कंपनीचे सिक्युरिटी ऑफिसर अरुण मेदने यांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. २८ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर या कालावधीत कंपनीच्या हद्दीतून तांब्याचे पाईप चोरून नेल्याची तक्रार त्यांनी दाखल केली होती. त्यानुसार ​सासवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शोध पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट दिली. कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मेघराज दत्तात्रेय फडतरे (वय २३, रा. बोपगाव, ता. पुरंदर) आणि प्रकाश दीपक निरगुडे (वय १९, रा. शिंपीआळी, सासवड), या संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. ​सासवडचे पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ​सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर राऊत, पोलिस हवालदार गणेश सोनवणे, दत्तात्रेय काळे, गोकूळ हिप्परकर आणि पोलिस कॉन्स्टेबल तुषार लोंढे, किरण तुपे, प्रवीण शेंडे, प्रणय मखरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेला स्व. अजित पवार यांचं नाव मिळणार? आदिती तटकरेंनी स्पष्ट केली भूमिका

Neha Bora: नेहा बोरा म्हणतात 'मी स्त्री नाही अन् पुरुषही नाही'! नॉन-बायनरी म्हणजे नक्की काय?

Shashi Tharoor: भारत समिटमध्ये 115 परदेशी वक्त्यांना प्रवेश नाकारला; शशी थरूर यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : कापसाच्या दरात घसरण, शेतकऱ्यांसमोर नवे संकट; बाजारात पाचशे ते साडे पाचशे कमी दराने कापसाची विक्री

IND vs NZ 4th ODI: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये Unplayable Deliveries असं काही नसतं, फलंदाजानं...; ८९ ऑल आऊटनंतर गौतम गंभीरकडून कानउघडणी

SCROLL FOR NEXT